कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): – विठ्ठलवाडी पूर्व परिसरात गेली अनेक वर्षे समाज सेवेत असलेले सुपरिचित समाजसेवक मनोज सिंह यांनी आपल्या अनेक सहकार्यांसह रविवारी शिवसेनेत प्रवेश केला आहे . जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे तसेच शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी मनोज सिंह आणि त्यांच्या सहकार्यांना हातात भगवा ध्वज देत पक्ष प्रवेश दिला .माजी नगरसेवक महादेव रायभोळे आणि दयानंद रामभोळे यांच्या उपस्थितीत नेहरू नगर येथील विचार मंचकावर या पक्ष प्रवेश कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते . महाराष्ट्रातील सत्तांतरणा नंतर शिवसेना आणि धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह कोणाचे या वादावर मुख्य निवडणूक आयोगाने पडदा टाकत राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचे शिक्कामोर्तब केल्यानंतर शिवसेनेत प्रवेश करणार्यांचा ओघ वाढला आहे .कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या कतृत्वामुळे कल्याण पूर्वेतील विविध संस्था संघटनेचे प्रतिनिधीही महेश गायकवाड यांच्या संपर्कात येत असून शिवसेना पक्षाला बळकटी मिळत आहे याचाच एक भाग म्हणून रविवारी मनोज सिंह यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे . पक्षात प्रवेश केल्या नंतर लवकर मनोज सिंग यांचेवर पक्ष नेतृत्व महत्वाची जबाबदारी सोपवतील असा विश्वास या समयी शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी बोलुन दाखवला .या समयी गुंजाई फाऊंडेशनचे शिवदास गायकवाड तसेच सोमेश सिंग, अविनाश दुबे, अमन विश्वकर्मा, श्रुरीकश गिरी, मधुर म्हात्रे, शाखा प्रमुख प्रशांत बोटे यांचे सह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.