कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड) – कल्याण पूर्वेतील समाज सेवक आणि गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक श्री. संजय गायकवाड यांचे व्यवस्थापक संजय नागेश शिर्के हे डॉक्टरेट पदवीने सन्मानित झाले आहेत .आदर्श ह्युमन राईट्स असोसिएशन ते फाउंडेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष/डायरेक्टर श्री संजय नागेश शिर्के हे मूळचे कोकणातले चिपलूण तालूका.जि.रत्नागिरी मुंबईत गिरणगाव कुंभार वाडा येथे तिन भावासोबत रहायचे शाळेय शिक्षण करत असताना परिस्थिती तशी बेताचीच असल्याने मोठ्या भावाबरोबर कंपणित इलेक्ट्रीक काम करत असत पण लहान पासूनच शिर्डीच्या साईबाबांच्या भक्ती ची ओढ लागलेली. तेव्हापासून दरवर्षी पायी प्रवास करून शिर्डीला श्री.साईबाबांच्या दर्शनासाठी जात असत .तीच वारी आता त्यांचा मुलगा प्रसाद संजय शिर्के करत आहेत. सामाजिक कार्याची ओढ हि परिस्थिती आणि साई सेवक झाल्या पासून झालेली परोपकारी वृत्ती आहे. आपण ज्या समाजात जन्माला आलो त्याच कुठंतरी देणं लागतो हा त्यांचा उद्देश आहे.अशात शिवसाई मित्र मंडळाच्या वतीने गेले अनेक वर्षे पायी पालखी, पारायण ते जेष्ठ साईभक्तांना विना मुल्य शिर्डी पर्यत ने आण करण्याकरिता विशेष टुर ची आज चार पाच वर्षे सेवा सुरू केली आहे. समाजात मानवाधिकार विचार जागृत करणे साठी दोन हजार तेरा पासून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे न्यायीक म्हणजे समाजात अनेक प्रकारच्या अन्याय अत्याचाराच्या गोष्टी घडत असतात म्हणून २०१३पासून मानवी हक्क संरक्षण अधिकार मिळविण्यासाठी आदर्श ह्युमन राईट्स असोसिएशन/फाउंडेशन ची स्थापना करून राज्य भर मानवाधिकार ची जनजागृती करत आहेत. त्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन अनेक आदिवासी पाड्यावर जाऊन आवश्यक ते मदतीचा हात देत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना पालक नाही अशा विद्यार्थ्यांची जमेल तेवढी शाळेची फि भरलेली आहे.तर काही ठिकाणी वह्या वाटप केले आहे.महिलांच्या हाताला काम म्हणून आईच्या नावाने श्री साई लक्ष्मी महिला गृह उद्योग सुरू करून महिलांना काम मिळत आहे. अनेक अनाथालयात जाऊन अनाथांची जातीने विचारपुस करून मदत करत आले आहेत. हे गेले तिस ते चाळीस वर्षे सेवेचे व्रत घेतलेले असून देखील या देशाच्या स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मुरबाड तालुक्यातील पवाळे गावी श्री साई लक्ष्मी अनाथालय उभारणी करून २५ फेब्रुवारी २०२३ला उद्घाटन केले आहे. एवढ्यावर न थांबता गरीब गरजू विद्यार्थ्यांना व भेटीस आलेल्यांना मदत करत आहेत.या संपुर्ण कार्याचा आढावा घेऊन मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नामांकन मिळाले आणि आज दिनांक सात एप्रिल 2023 रोजी दिल्ली येथील फरीदाबाद या हरियाना जवळच असलेल्या एका मोठ्या कार्यक्रमात श्री संजय नागेश शिर्के यांना डॉक्टरेट पदवी देऊन international Award winner.India’s Got talent – Fire Escap Performer, Dr.c.p.yadav आणि मान्यवरांच्या हस्ते व भारतातील अनेक राज्यांतील नामांकित उपस्थितांसमोर सन्मानित करण्यात आले.या समयी त्यांच्या जवळचे स्नेही आणि संघटनेचे उपाध्यक्ष आयु . प्रकाश कांबळे,व चिरंजीव श्री.प्रसाद संजय शिर्के तर पत्रकार पटनाईक, मित्र प्रविण सिंग,राजेश उपाद्याय आणि दिल्ली तसेच युपी मधील ओळखीचे खास मित्र परिवार उपस्थित होते.