Home स्टोरी कल्याण पूर्वेतील ‘संविधान गुण गौरव’ स्पर्धेला उत्फुर्त प्रतिसाद !

कल्याण पूर्वेतील ‘संविधान गुण गौरव’ स्पर्धेला उत्फुर्त प्रतिसाद !

130

कल्याण प्रतिनिधी :(आनंद गायकवाड ):- भारतीय संविधानाचे महत्व वाढण्याबरोबरच समाज मनात संविधानाप्रती किती प्रमाणात जागृकता आहे याची पडताळणी करण्याच्या उद्देशाने कल्याण पूर्वेतील विश्वभुषण डॉ . बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती आणि संविधान गुण गौरव परिक्षा यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान गौरव स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते, या परिक्षेत १०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेत संविधाना प्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली .विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिना निमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . नुतन ज्ञान मंदिर शाळेत पार पडलेल्या या आगळ्या वेगळ्या स्पर्धेत जयंती उत्सव समितीच्या कोअर कमिटीच्या काही सदस्यांसह समाज बांधव, तसेच शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली . ही परिक्षा सर्व गटातील प्रवर्गसाठी खुली ठेवण्यात आली होती .या समयी दलीत मित्र अण्णा रोकडे, माजी अध्यक्ष केतन रोकडे, विद्यमान अध्यक्षा आयु . सिंधुताई मेश्राम सचिव ललिताताई आखाडे, खजिनदार सुवर्णाताई गायकवाड यांचे सह स्पर्धेचे संयोजक विलास पवार, अशोक भोसले, नुरखा पठाण, धनविजय सर आदि मान्यवर आणि महोत्सव समितीचे सदस्य पदाधिकारी उपस्थित होते .