कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड) :- कल्याण पूर्वलीत लोक वाटीका या गृह संकुलातील नागरीकांना बसण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ८ बाकडे दिले आहेत. या बाकड्यांचा लोकार्पण सोहळा जेष्ठ नागरीकांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. महापालिकेतील लोक प्रतिनिधींची सत्ता जावून सद्या पालिकेचा कारभार राज्य शासनाच्या प्रशासक तथा पालिका आयुक्तांच्या हाती आहे . या परिस्थितीत पालिकेच्या नागरी सुविधांवर अवलंबून न रहाता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष सुधीर वंडार पाटील तसेच जिल्हा युवक उपाध्यक्ष गिरीश पांडूरंग पाटील यांच्या योगदानातून लोकवाटी गृह संकुल परिसरात ८ बाकडे बसविण्यात आले आहेत. या बाकड्यांचा लोकार्पण सोहळा जेष्ठ नागरीकांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला.
यावेळी जिल्हा सचिव अर्जुन पानसरे तसेच शिवाजी ओरपे, वरुण वळवी, वैभव कदम, सौ . ललीता भोसले, सायली गावड़े शरयु चव्हाण, लता परब, मंजुळा ओरपे, स्नेहा पाटील, नीता जाधव, गीता कदम, यांचे सह हिरकणी महिला बचत गट, जिजाऊ महिला बचत गट यांचे विशेष असे सहकार्य लाभले. गेली अनेक वर्षे मागणी करूनही पालिकेच्या माध्यमातून बाकडे उपलब्द झाले नाहीत परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ८ बाकडे उपलब्द झाल्याने परिसरातील नागरीकांत आनंद व्यक्त केला जात आहे.