Home स्टोरी कल्याण पूर्वेतील पुस्तक रूपी ‘जय शिवराय ‘ मांडणीच्या नांवाची OMG वर्ल्ड रेकॉर्ड...

कल्याण पूर्वेतील पुस्तक रूपी ‘जय शिवराय ‘ मांडणीच्या नांवाची OMG वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद !

103

कल्याण प्रतिनिधी (आनंद गायकवाड ): – शिवजयंती उत्सव समिती कल्याण पूर्व यांनी १९ फेब्रुवारी २०२३ रोजी साजऱ्या केलेल्या शिवजयंती निमित्त चार हजार १५ पुस्तकांच्या सहाय्याने ‘जय शिवराय ‘ या पुस्तक मांडणीची निमिर्ती केली होती . या सादरीकरणाचे ओ . एम . जी . वल्ड रेकॉर्ड मध्ये दोन स्वरूपात जागतीक स्तरावर नोंद झाली आहे .उत्सव समितीचे मावळते अध्यक्ष रुपेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून आणि महाराष्टू राज्य केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट यांनी प्रायोजित केलेल्या तिसाई मंदीराच्या प्रांगणातीत

जय शिवराय ‘ या पुस्तक मांडणीत लोक सहभागातून ४०१५ पुस्तकांचे संकलन अवघ्या ३ दिवसात झाल्या बद्दल तसेच ३ फुट बाय ४० फुट पुस्तकांची मांडणी ‘जय शिवराय ‘ या शब्दांनी बनवल्या बद्दल दोन वेगवेगळ्या विक्रमांची नोंद ओ एम जी वल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे . या रेकॉर्ड चे सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र ओ एम जी चे प्रतिनिधी श्री दिनेश गुप्ता यांनी गुढी पाढव्याच्या शुभमुहूर्तावर तिसाई मंदीराच्या प्रांगणातील एका कार्यक्रमात मावळते अध्यक्ष रुपेश गायकवाड तसेच विद्यमान अध्यक्ष राजू अंकुश यांचे कडे सुपूर्त केले .या समयी आमदार श्री गणपत गायकवाड, समितीचे संस्थापक अध्यक्ष भगवानशेठ भोईर, सचिव नरेंद्र सुर्यवंशी, तसेच विष्णू जाधव, अभिमन्यू गायकवाड, जरीमरी सेवा मंडळाचे अध्यक्ष दत्ता गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते .