स्मारक समितीचे कार्याध्यक्ष महेश गायकवाड यांनी व्यक्त केला विश्वास….
कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड):- बहुचर्चित कल्याण पूर्वेतील प्रभाग ड कार्यालया समोरील डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामाचा भूमिपूजन सोहळा १२ एप्रिल २०२२ रोजी संपन्न झाला . हे काम ३०० दिवसात पूर्ण होणे अपेक्षीत होते परंतु प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर या स्मारक कामाच्या प्रारंभीच अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या म्हणून हे काम काहीसे संथ गतीने सुरु असल्याचे दिसत असले तरीही आता भविष्यात हे काम तीव्र गतीने पूर्ण होणार असल्याचा विश्वास स्मारक समितीचे कार्याध्यक्ष आणि शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी व्यक्त केला आहे . महेश गायकवाड यांनी आपल्या सहकार्यांसह सोमवारी दुपारी कल्याण डोंबिवली महापालिकेचे शहर अभियंते श्री अहिरे यांच्या कार्यालयात जावून या कामा बाबतची माहिती जाणून घेतली, या दरम्यान स्माकाच्या मुळ आराखड्यात झालेला बदल, आणि इतर काही तांत्रीक अडचणी मुळे वर्क ऑर्डरच्या कालावधीत स्मारकाचे काम पूर्ण होत नसल्याचे स्पष्ट झाला आहे . सध्या स्मारकाचा मुळ ढाचा बांधून पूर्ण झाला असला तरीही अंतर्गत डिझाईन आणि संरचनेचे बरेचसे काम अपूर्ण असून या कामाला अंतीम स्वरूप देण्याचे काम जोरात चालु असल्याचे संबंधीत अधिकार्यांनी या वेळी सांगितले असल्याने येत्या एक ते दोन महिन्यात स्मारकाचे काम पूर्ण होणार आहे . तरीही या कामाला गती देण्याचे निर्देश महेश गायकवाड यांनी संबंधीत ठेकेदाराला दिले आहेत .शहर अभियंते यांच्या दालनात संपन्न झालेल्या या बैठकीत शहर अभियंते श्री अहिरे, प्रकल्प अधिकारी शशीम केदार यांचे सह सुमेध हुमणे, निलेश रसाळ उपस्थित होते .