Home स्पोर्ट कल्याण पूर्वेतील कर्मवीर दादासाहेब क्रीडा पटांगणावर सिद्धार्थ युवक क्रिडा मंडळ आयोजित –...

कल्याण पूर्वेतील कर्मवीर दादासाहेब क्रीडा पटांगणावर सिद्धार्थ युवक क्रिडा मंडळ आयोजित – भव्य कब्बड्डी स्पर्धेला प्रारंभ

40

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): – सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कल्याण पूर्वेतील सिद्धार्थ युवक क्रिडा मंडळाच्या विद्यमाने कल्याण पूर्वेतील कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रीडा पटांगणावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य कब्बड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे औपचारीक उद्‌घाटक कल्याण पूर्व – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष केतन रोकडे यांचे हस्ते करण्यात आले. ठाणे जिल्हा कब्बड्डी एसोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य ब गटातील कब्बड्डी सामन्यात संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून एकूण ४२ संघांनी भाग घेतला असून हे सामने बाद पद्धतीने खेळवले जात आहेत.

शनिवार दिनांक २२ एप्रिल ते सोमवार दिनांक २४ एप्रिल या तीन दिवसात हे सामने खेळवले जाणार आहेत. या सामन्यातीत अंतीम लढत सोमवार दिनांक २४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता होणार असून त्या नंतर बक्षीस वितरण समारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या सामन्याचा जास्तीत जास्त क्रीडा रसिकांनी आस्वाद घेण्याचे आवाहन सामन्याचे उद्घाटक केतन रोकडे, तसेच सिद्धार्थ युवक मंडळाचे अध्यक्ष सागर निकम यांचेसहरोहन केदारे, आकाश गायकवाड, दिपक शिंदे, सुरेश केदारे, अमरदिप शिंदे, अमित गायकवाड , अनिकेत गायकवाड , सौरभ कांबळे , प्रतिक सोनवणे ,समीर गांगुर्डे , रितिक सोनवणे आदी पदाधिकार्‍यांनी केले आहे.