Home स्टोरी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत दिव्यांग मुलांना साहित्यांचे वाटप!

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत दिव्यांग मुलांना साहित्यांचे वाटप!

190

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे पालिका क्षेत्रातील गरजंत दिव्यांग विद्यार्थ्यांना विनामुल्य साहित्यांचे वाटप करण्यात आहे. शिक्षण विभागाने राबवलेल्या या उपक्रमामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना जगण्याची नवी उभारी मिळाली असल्याने शिक्षण मंडळाचा हा स्त्युत्य उपक्रम आहे असे गौरोद्गार पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी काढले. दिव्यांगाना पालिका आयुक्तांच्या हस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले. या समयी उपस्थितांना संबोधीत करतांना आयुक्त दांगडे पुढे म्हणाले की, दिव्यांग मुलांना साहित्य वाटप म्हणजे त्यांना सर्व साधारण माणसांप्रमाणे जीवन जगता यावे, यासाठी‍ शिक्षण मंडळाचा हा उपक्रम स्तुत्य आहे. या साहित्यांमुळे सर्वसामान्य नागरीकां प्रमाणे दिव्यांगांना जगण्याची प्रेरणा मिळणार आहे. पुरविण्यात आलेले हे साहित्य दिव्यांग मुलांच्या पालकांनी त्यांच्या मुलांसाठी नियमित वापरण्याची दक्षता घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी उपस्थित पालकांना केली.

समग्र शिक्षा अभियानातंर्गत महापालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात या साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, महापालिका सचिव संजय जाधव, उपायुक्त अतुल पाटील, शिक्षण विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे, प्रशासन अधिकारी विजय सरकटे, अधिव्याख्याता दिनेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. या साहित्य वाटप कार्यक्रमात o ते १८ वयोगटातील ६७ विशेष गरज असणार्‍या दिव्यांग बालकांना रोलेटर, कॉर्नर सिंटींग, वॉकर, पेडियाट्रीक व्हिलचेअर, ‍व्हिलचेअर, कमोड चेअर, लो व्हिजन किट, ब्रेल किट, हॅन्ड स्टिक, स्प्लिंट, सी.पी.चेअर, एल.बी.क्रचेस, थेराबँड मध्यम, डि श्रवण यंत्र, ओरिएटेशन किट या साहित्याचे मा. आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे व इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण मंडळाचे उपायुक्त‍ स्वाती देशपांडे यांनी केले तसेच मिलिंद अहिरे आय.ई.समन्वयक, समग्र शिक्षा यांनी आयोजित केलेल्या या साहित्य वाटप कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली.