कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड):- गेली अनेक वर्षे कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडला लागूनच असलेल्या काटेमानिवली येथील प्रभाग ड कार्यालयाच्या संरक्षण भिंतींच्या कंपाउंडच्या आणि कार्यालयाच्या गेटच्या आत कार्यालयाच्या आजुबाच्या इमारतीत रहाणार्या बाहेरील नागरीकांनी ७ x २४ तास अनधिकृत चार चाकी वाहन तळाची निर्मिती केली आहे या वाहनांवर संबंधीत प्रभाग कार्यलयाकडून कसल्याही प्रकारचा प्रतिबंध केला जात नसल्याने नागरीकांत आश्चर्य युक्त संताप व्यक्त केला जात आहे. या बेकायदेशीर वाहन तळाचे वृत्त ४ डिसेंबर २०२२ रोजी अनेक वृत्त पत्रात प्रसिद्ध होताच प्रभाग ५ ड च्या तद्कालिन सहाय्यक आयुक्त सौ . हेमा मुंबरकर यांनी ५ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी वाहतूक शाखेच्या ‘उप विभाग वाहतूक विभागाच्या सहकार्याने याअनधिकृत वाहन तळाचा बर्यापैंकी बाजार उठवला होता. त्या वेळी काही वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली होती .त्या नंतर काही दिवसातच ‘या पटांगणात वाहने उभी करू नयेत – केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल ‘ या मचकूराचे फलकही लावण्यात आले आहेत. परंतु याच फलकांखाली गेली अनेक दिवस खाजगी चारचाकी अनधिकृत वाहन तळाचा बाजार पुन्हा नियमित पणे सुरु झाला आहे.
कारवाई नंतर अवघ्या काही दिवसातच हा अनधिकृत वाहन तळाची पुन्हा फिरून जैसे थे निर्मिती झाली असल्याने या अनधिकृत आणि बेकायदेशीर वाहन तळाला नक्की संरक्षण कोणाचे आणि का? असा प्रश्न या ठिकाणी सकाळी जॉगिंगला येणारे जेष्ठ नागरीकांसह सर्वसामान्य नागरीक विचारु लागले आहेत .