Home स्टोरी कलंबिस्त सावंतवाडी उपविभागीय भुमिअभिलेख कार्यालयातर्फे व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शेतकऱ्यांना सनद वाटप

कलंबिस्त सावंतवाडी उपविभागीय भुमिअभिलेख कार्यालयातर्फे व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शेतकऱ्यांना सनद वाटप

197

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त गावात गावठण वस्तीत जाऊन थेट शेतकऱ्यांना सावंतवाडी उपविभागीय भुमिअभिलेख कार्यालयातर्फे व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने जवळपास १७ शेतकऱ्यांना जमिन सनद वाटप करण्यात आली. भूमी अभिलेख विभागाच्या मार्फत गावठाण जमिनीचे सर्वेक्षण व जमिन मोजणी भूमी अभिलेख विभागाचे जिल्हाध्यक्ष वीर व तालुका उपाधीक्षक श्रीमती प्रियांका साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावठण अमीनीचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे .या पार्श्वभूमीवर आज शुक्रवार दि. ३ मार्च रोजी कलंबिस्त गावात राऊळवाडी येथील गावठाण वस्तीतील भागात जाऊन थेट शेतकऱ्यांच्या हाती सरपंच सपना संदीप सावंत यांच्या हस्ते सनद वाटप उपक्रम राबवण्यात आला. यावेळी उपसरपंच सुरेश पास्ते, भूमी अभिलेख उपविभागीय कार्यालय सावंतवाडीचे कर्मचारी संदीप सावंत, सामाजिक कार्यकर्ते बाळा राजगे, मधुकर राऊळ, सूर्यकांत राऊळ, सिताराम राऊळ, दत्ताराम राऊळ, गणू राऊळ, शंकर राऊळ, राजाराम राऊळ, नरेंद्र पास्ते, वनिता पास्ते, गंगाराम राऊळ, एकनाथ राऊळ, शांताराम राऊळ, अक्षय राऊळ, आनंद राऊळ, ग्रामसेवक बाळासाहेब फुंदे, शेतकरी ग्रामस्थ आधी उपस्थित होते. एकूण १७ शेतकऱ्यांना भूमी अभिलेख विभागामार्फत जमिनीचा सनद पत्र देण्यात आले. हा उपक्रम थेट वस्तीत जाऊन ग्रामपंचायत विभागामार्फत करण्यात आल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. गावागावातील वस्तीत जाऊन यापुढे ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक उपक्रम घेतले जातील असे सरपंच सौ सावंत यांनी स्पष्ट केले. फोटो कलंबिस्त राऊळवाडी येथील गावठाण वस्तीत भूमि अभिलेख विभाग व ग्रामपंचायत च्या माध्यमातून शेतकऱ्यांना सनद पत्र वाटप करताना सरपंच सपना सावंत, बाजूला उपसरपंच सुरेश पास्ते, बाळा राजघे, मधुकर राऊळ, संदीप सावंत, सूर्यकांत राऊळ, सिताराम राऊळ, दत्ताराम राऊळ आधी छाया अक्षय राऊळ कलंबिस्त