सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त येथील शिवशक्ती कला क्रीडा मंडळ व ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर व रक्तगट तपासणी मध्ये जवळपास १०० हून अधिक जणांनी सहभाग घेतला. यावेळी ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष सेवानिवृत्त पोलीस उपविभागीय अधिकारी दयानंद गवस यांनी रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. या भागात सैनिकी परंपरा आहे. अशा सैनिकी परंपरा असलेल्या भागात सामाजिक बांधिलकीतून उपक्रम घेतले जात आहेत. येत्या काळात या भागात पोलीस आणि सैन्य दलाचे प्रशिक्षण शिबिर घेतले जाईल. या भागाला एक वेगळाच वारसा आहे असे ते म्हणाले.
कलंबिस्त गणशेळवाडी येथील नवदुर्गा उत्सवाच्या ठिकाणी सामाजिक बांधिलकीत. रक्तगट तपासणी व रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन सेवानिवृत्त पोलीस उपविभागीय अधिकारी श्री गवस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवशक्ती कला क्रीडा मंडळ चे अध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य रमेश सावंत, सरपंच सपना सावंत, उपसरपंच सुरेश पास्ते, पोलीस पाटील प्रियांका सावंत, ऑनकॉल रक्तदाते संस्थेचे उपाध्यक्ष सौ. मीनल सावंत कार्याध्यक्ष महेश रेमुळकर, सचिव बाबली गवंडे, खजिनदार सिद्धार्थ पराडकर, सदस्य दिनेश गावडे, बाळकृष्ण राऊळ, रवींद्र तावडे, एस. पी. एम. मेडिकल कॉलेज हॉस्पिटल च्या टीमचे लॅब टेक्निशियन मनीष यादव, प्रवीण सावंत, प्रथमेश सावंत,नरेंद्र बिडये, प्रशांत पास्ते, प्रकाश सावंत, सौ स्नेहल पवार, रवी कमल सावंत, गौरव बिडये, निखिल बिडये आधी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविक मध्ये बोलताना श्री सावंत म्हणाले. सन २००४ मध्ये हे मंडळ स्थापन करण्यात आले होते. आज या मंडळाला वीस वर्षे होत आहेत. विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून नवरात्र उत्सवात आम्ही नवदुर्गा उत्सव साजरा करतो. यावर्षी एक सामाजिक बांधिलकीतून रक्तगट व रक्तदान शिबिर ऑन कॉल सिंधुदुर्ग संस्थेतर्फे आयोजित करण्यात आला आहे. असे उपक्रम घेतले जातील. असे ते म्हणाले. यावेळी सचिव बाबली गवंडे. यांनी ऑन कॉल रक्तदाते संस्था ही महिनाभरापूर स्थापन झाली आहे. या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात निश्चितपणे सामाजिक उपक्रमातून सर्व सहकार्य केले जाईल. असे ते म्हणाले. यावेळी पोलीस पाटील प्रियांका सावंत यांनी मंडळाने स्तुत्य उपक्रम राबवला आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट संतोष सावंत, आभार महेश रेमुळकर यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. यावेळी जवळपास २० जणांनी रक्तदान केले. तर अन्यथानाने रक्तगट तपासणी करण्यात आली. हे रक्तदान शिबिर पडवे येथील एस. पी. एम. मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या सहकार्याने करण्यात आले.