Home Uncategorized कलंबिस्त येथील पूल दुरुस्तीसाठी महिन्याभराच्या आत निधी देण्याचे दिपक केसरकरांचे आश्वासन…..

कलंबिस्त येथील पूल दुरुस्तीसाठी महिन्याभराच्या आत निधी देण्याचे दिपक केसरकरांचे आश्वासन…..

61

सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त येथील महत्त्वकांक्षी असलेला आणि गेल्या पूरस्थितीत तुटलेला पूल दुरुस्तीसाठी भरघोस निधी आपण देऊन येथे महिन्याभराच्या आत हे दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी आज रविवार दि. २६ फेब्रुवारी २०२३ रोजी दिले. या गावच्या सरपंच सौ. सपना संदीप सावंत यांनी श्री दिपक केसरकर यांच्याकडे साकडे घातले. ऑनलाईन त्यांच्याशी या संदर्भात चर्चा केली. तसेच गावातील विकास कामांसंदर्भात निधी उपलब्ध करून द्या. असेही स्पष्ट केले. यावेळी कलंबिस्त गावातील ग्रामपंचायत सदस्य हनुमंत पास्ते शाहू पास्ते, पांडुरंग पास्ते, उदय सावंत, जीवन लाड, संजीव पालकर, इत्यादी उपस्थित होते. यावेळी सौ. सावंत यांनी श्री दिपक केसरकर यांच्याकडे साकडे घालताना कलंबिस्त गावातील कुलदैवत सातेरी मंदिराकडे जाणारा पूल आपल्या प्रयत्नाने मंजूर झाला होता, आणि तो उभारण्यात आला असून अडीच कोटी खर्च करून हे फुल बांधण्यात आले होते. मात्र पहिल्याच पावसाळ्यात अतिवृष्टी उडवल्याने या पुलाचा अर्धा भाग तुटून गेला. त्यामुळे या भागात येजा करणारे शेतकरी व धामण मळा भागातील बहुसंख्य शेतकरी व लोकांचे हाल झाले आहेत. हे अर्धवट स्थितीत तुटून गेलेला पूल दुरुस्त करून येत्या पावसाळापूर्वी हे अर्धवट पूल उभारण्यात यावे. आणि आपण या भागाचे आमदार व लोकप्रतिनिधी मंत्री म्हणून याकडे लक्ष द्यावे, तसेच गावातील शैक्षणिक आरोग्य इत्यादी सुविधा तसेच रस्ते यासाठी ही निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती त्यांनी केली. यावेळी श्री दिपक केसरकर यांनी निश्चितपणे आपण हे तुटलेले पूल साठी निधी उपलब्ध करून देऊन लवकरच या भागातील लोकांचे होणारे हाल दूर केले जातील, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे गेली काही महिने शासकीय प्रत्यक्ष रखडून राहिलेल्या हे पुलाचे काम आता मार्गी लागेल.