Home स्टोरी कलंबिस्त आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या माजी सैनिकांचा...

कलंबिस्त आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या माजी सैनिकांचा सन्मान गौरव…!

385

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त गाव सैनिकी परंपरेचा गाव आहे.  या गावात ज्या सैनिकांना ७५ वर्षे पूर्ण झाली, अशा सैनिकांचा सन्मान गौरव करण्याची परंपरा प्रथा कलंबिस्त आजी माजी सैनिक संघटने सुरू केली आहे. प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीला हा सन्मान गौरव सोहळा केला जातो. यंदा माजी सैनिक एकनाथ वाळके व लक्ष्मण जाधव या दोन सैनिकांना ७५ वर्ष वयाची पूर्ण झाली. त्याबद्दल या दोघांचाही शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सैनिक कल्याण विभागाचे संघटक श्रीधर गावडे यांच्या हस्ते गौरव सन्मान करण्यात आला.

यावेळी सैनिक सेवेतून सेवा बजावून निवृत्त झाल्याबद्दल माजी सैनिक प्रकाश सावंत व माजी सैनिक संतोष सावंत यांचाही सन्मान करण्यात आला. कलंबिस्त येथील रणस्तंभ येते सैनिकी परंपरेत प्रजासत्ताक दिन सोहळा आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने सन्मान गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सैनिक कल्याण कार्यालयाचे श्रीधर गावडे उपस्थित होते. यावेळी आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन दीनानाथ सावंत, उपाध्यक्ष कॅप्टन अरुण सावंत, माजी सरपंच अनंत सावंत, खजिनदार विश्वजीत सावंत, सगुण पास्ते, गावचे प्रमुख देवकर अनिल सावंत, गावकर अनिल हरिश्चंद्र सावंत तसेच आधी ज्येष्ठ ग्रामस्थ शाळेतील विद्यार्थी शिक्षकआधी उपस्थित होते. यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने रणस्तंभ जवळ ध्वजारोहण देवकार श्री अनिल सावंत यांच्या हस्ते तर माजी सैनिक अशोक माडगूत यांच्या हस्ते रणस्तंबाला पुष्पचक्र वाहण्यात आले. त्यानंतर सन्मान गौरव सौ. मेघना महादेव मालकर(प्राचार्य सेंटर फॉर एज्युकेशन टेकनौलाजी संचलित वूमेन कॉलेज ऑफ कॉ्प्युटर स्टडीज अँड रिसर्च सावंतवाडी): कु. आशिया आसद सांगवकर, विशेष पारितोषिक: वकृत्व स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम आल्याबद्दल कुमारी अमृता अरविंद पास्ते यांचा सत्कार करण्यात आला.

 

यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ आजी-माजी सैनिक उपस्थित होते फोटो सावंतवाडी कलंबिस्त येतील आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने ७५ वर्ष पूर्ण झालेल्या माजी सैनिकांचा तसेच सेवानिवृत्त सैनिकांचा प्रमाणपत्र सन्मान चिन्ह देऊन गौरव करताना सैनिक कल्याण विभागाचे संघटक श्रीधर गावडे, बाजूला अध्यक्ष दिनानाथ सावंत, अरुण सावंत, अनंत सावंत सगुण पास्ते, विश्वजीत सावंत, अशोक माडगूत, विद्यार्थिनी आधी.