सिंधुदुर्ग: सातारा जिल्ह्यातील कराड येथे भक्तिभावाचे प्रतिक असलेल्या कृष्णा आणि कोयना नद्यांच्या संगमाजवळ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्मारक उभारले आहे. अनेक देशी आणि विदेशी पर्ययटकांसाठी आकर्षण असलेले हे समाधी स्मारक म्हणजे कराडचा सांस्कृतिक वारसा आहे. असे असतांनाही प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अत्यंत पवित्र अशा प्रितीसांगमाच्या मागच्या बाजूस हजरत जाफर अली बाबा या नावाने अवैध मजार बांधण्यात आली आहे.
आता गुगल मॅपवरही या मजारीचे लोकेशन दाखवले जात आहे. असे असूनही प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसले आहे. हे अतिशय संतापजनक आहे. आतातरी शासनाने तातडीने ही अवैध मजार हटवावी, तसेच या अवैध बांधकामाला उत्तरदायी असलेल्या प्रशासकीय अधिकार्यांवर अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
समितीने शासनाला पाठवण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर कराड नगरपालिकेने याच कृष्णा-कोयनेच्या प्रीतीसंगमावर साडेसात एकर जागेवर हे स्मारक बांधले. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या ठिकाणी अवैध मजार बांधण्यात आली आहे. महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या अवैध मजारी, दर्गे, पीर उभे राहिल्याचे निदर्शनास येत आहे. अशा प्रकारे मजारी बांधून जागा बळकावणे म्हणजे हा एकप्रकारे ‘लँड जिहाद’च आहे. ही मजार भाव-भक्ति आणि संस्कृती यांचा वारसा असलेल्या प्रीतीसंगमाच्या मागच्याच बाजूस असल्याने या पर्यटनाचे आकर्षण असणार्या स्मारकाच्या सौंदर्यास गालबोट लागले आहे. शासनाने कराड नगरपालिकेस ही मजार तात्काळ हटवण्यासाठी सूचना द्याव्यात. शासन आणि प्रशासन यांनी समयमर्यादेत ही कारवाई करावी आणि अवैध मजार त्वरित हटवावी. तसेच या अवैध दर्ग्याची गुगल मॅपवरील नोंद रहित होण्यासाठीही योग्य ती कारवाई करावी, अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.
आपला नम्र, श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती संपर्क : 70203 83264