सिंधुदुर्ग: कबड्डी फेडरेशनने काही निर्णय हे खेळाडूंच्या हिताचे नाहीत. तर यामुळे खेळाडूंचे खच्चीकरण होणार आहेत. कबड्डी स्पर्धा आयोजक योगेश धुरी यांनी स्पष्ट केले आहे. कब्बड्डी फेडरेशन ने जे निर्णय घेतले ते खेळाडूंच्या हिताचे आहेत का? खेळाडूंना शिस्त जरूर लावावी परंतु काही निर्णय हे चुकीचे आहेत. आयोजक म्हणून आमचे मत आहे.

फेडरेशन खेळाडूंच्या शिस्तीवर जरूर नियम लावावेत पण तेवढी खेळाडूंना सुविधा पण द्यावी. पंच बऱ्याच वेळा चुकीचे निर्णय देतात. काही पंच तर आपल्या भागातील संघ जिंकावा यासाठी प्रयत्न करतात तर काही वैमन्यास्यातून निर्णय देतात. खेळाडूंना ज्याप्रमाणे निर्णय केलेत त्याप्रमाणे पंचाना देखील करा चुकीचे निर्णय दिल्या स पंचावर बंदी घाला.त्याच बरोबर निर्णय अचूक येण्यासाठी फेडरेशन ने थर्ड अंपायर ही पद्धत अस्तित्वात आणावी याची सगळी व्यवस्था फेडरेशनने करावी आजपर्यंत सावंतवाडी तालुका सोडून किती खेळाडूची निवड झाली ? हे पण फेडरेशन ने तपासाव. कुठलाही आयोजकांचा स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभाग घ्यावा यासाठी प्रयत्न असतात. यामुळे मंडळावर फेडरेशन ने निर्णय लादु नये.काही वेळा ग्रामीण भागात अपुऱ्या व्यवस्थेअभावी वेळ लागतो,त्यामुळे पंचांच्या मानधनात वाढ करता येणार नाही. फेडरेशन ने चांगले निर्णय घेतले तर निश्चित त्यांच्या पाठिशी राहू.