Home क्राईम कत्तल खान्यात घेऊन जाणाऱ्या ५ गायीची गोराक्षांकाकडून सुटका..

कत्तल खान्यात घेऊन जाणाऱ्या ५ गायीची गोराक्षांकाकडून सुटका..

254

सावंतवाडी प्रतिनिधी: कुडाळ येथून आजरा येथे कत्तलखाना घेऊन जाणाऱ्या पाच गाईंची सुटका गोरक्षकांनी पोलिसांवी केली याप्रकरणी यासीर आजम शेख, (वय ३१वर्षे) आजीम रहीमान शेख, (वय ५७ वर्षे) दोन्ही रा. पिंगुळी गोंधळपूर मुस्लिमवाडी ता. कुडाळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

त्यांच्या जवळ असलेल्या बोलेरो पिकअप नंबर MH०७ -AJ-०६६७ मध्ये दि. १७ ऑगस्ट दिवशी रोजी पहाटे ०५ .०० वाजता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग येथील सहाय्यक पोलीस उप निरीक्षक श्री. गुरुनाथ कोयंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. प्रकाश कदम, श्री . प्रमोद काळसेकर, पोलीस नाईक श्री. चंद्रकांत पालकर यांनी सावंतवाडी ते आंबोली जाणाऱ्या रोडवर (बूर्डी पुल) कारिवडे , ता. सावंतवडी येथे आरोपीत यासीर आजम शेख, आजीम रहीमान शेख, दोन्ही रा. पिंगुळी गोंधळपूर मुस्लिमवाडी ता. कुडाळ येथील आहेत.

बोलेरो पिकअप नंबर MH०७ -AJ-०६६७ मधे ५ गायी कत्तलीसाठी आजरा येथे घेऊन जात असताना मिळून आलेले असल्याने त्यांचे विरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा व प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम अंतर्गत कारवाई केली.

त्यांचे ताब्यातून ४ लाख रू. किमतीची बोलेरो पिकअप गाडी आणि अंदाजे ४२ हजार रू. किमतीच्या गायींची सुटका करून त्यांना गो शाळेत जमा केले. सदरच्या गुन्ह्याची फिर्याद सरकारतर्फे पोलीस हवालदार श्री. प्रमोद काळसेकर यांनी दिली.