Home स्टोरी कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, सावंतवाडी रेल्वे स्टेशन रस्त्यांची कामे होणार काँक्रिटीकरण.

कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, सावंतवाडी रेल्वे स्टेशन रस्त्यांची कामे होणार काँक्रिटीकरण.

204

सिंधुदुर्ग: कोकण रेल्वे मार्गावर बांधण्यात आलेल्या रेल्वे स्थानकांना जोडणा-या रस्त्यांचे काम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेले असून या रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीची कामे अनेक वर्ष न झाल्याने रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. रेल्वे मार्गावरुन जाणा-या सर्व प्रवाशांना याच मार्गावरून ये-जा करावी लागते. राज्यातील रेल्वे स्थानकांना जोडणारा रस्ता सुशोभित व चांगल्या दर्जाचा असावा तसेच रेल्वे स्थानक परीसर अधिक दर्जेदार करण्यात यावेत अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, यांनी दिल्या आहेत. त्यामध्ये सिधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ व सावंतवाडी या स्थानकांचा प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे. त्याप्रमाणे सदरील चार रेल्वे स्थानकाना जोडणाऱ्या रस्त्याचे कॉक्रिटीकरण व सुशोभीकरण करण्याच्या कामांचा मार्च च्या अर्थसंकल्प मध्ये समावेश करण्यात आला आहे.

या कामांचा ऑनलाईन शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत दि. ८ ऑगस्ट दिवशी सकाळी ११ वाजता येथे करण्यात येणार आहे. या ऑनलाइन शुभारंभ प्रसंगी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार निरंजन डावखरे, आमदार अनिकेत तटकरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार नितेश राणे, वैभव नाईक, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन मुख्य अभियंता शरद राजभोज, अधीक्षक अभियंता छाया नाईक , कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उपविभाग अधीक्षक विनायक जोशी आदींनी केले आहे. या रस्त्याच्या डिझाईन तयार करण्यात आली असून, मुंबई पुण्याच्या धर्तीवर हे रस्ते विकसित केले जाणार असल्यामुळे या रेल्वे स्टेशन परिसरांचे रूप पालटून जाणार आहे.