Home स्टोरी कडावल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामाची निविदा प्रसिद्ध

कडावल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामाची निविदा प्रसिद्ध

87

महाविकास आघाडी सरकारच्या काळात आ. वैभव नाईक यांनी मंजूर केला होता निधी…!

 

माजी जि. प. सदस्य नागेंद्र परब, सरपंच शीतल कल्याणकर व ग्रामस्थांचे सहकार्य…!

सिंधुदुर्ग: महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा करून मंजूर केलेल्या कुडाळ तालुक्यातील कडावल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत व कर्मचारी निवासस्थानाचे बांधकाम करण्यासाठी ४ कोटी ६१ लाख ६८ हजार रु निधी आ. वैभव नाईक यांनी मंजूर करून घेतला होता.पुढील वर्षभरात हे काम पूर्णत्वास नेले जाणार आहे.

 

कडावल प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारती जीर्ण झाली आहे. रुग्णांना आवश्यक सोयी नसल्याने गैरसोय होत आहे. त्यामुळे याठिकाणी नवीन इमारतीसाठी निधी मंजूर करण्याची मागणी माजी जि. प. सदस्य नागेंद्र परब, कडावल सरपंच शीतल कल्याणकर, गुरुनाथ मुंज, संदीप सावंत, अमित कल्याणकर, राजू मुंज, विद्या मुंज यांनी आ. वैभव नाईक यांच्याकडे केली होती.त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा करून ४ कोटी ६१ लाख ६८ हजार रु निधी आ. वैभव नाईक यांनी मंजूर करून घेतला होता. मात्र जागेच्या प्रश्नामुळे पुढील कार्यवाही थांबली होती.सरपंच शीतल कल्याणकर व ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीने जागा हस्तांतरित केल्यानंतर या कामाची ऑनलाईन निविदा राष्ट्रीय आरोग्य अभियान पायाभूत सुविधा विकास कक्षचे अधिक्षक अभियंता यांनी प्रसिद्ध केली आहे.