Home राजकारण औरंगजेबच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्यांनी या सरकारव टीका करू नये…. विखे पाटील

औरंगजेबच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्यांनी या सरकारव टीका करू नये…. विखे पाटील

60

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी काल सामनातून भाजप वल्गना करत असते अशी टीका भाजपवर केली होती. त्यांच्या या टीकेविषयी महसूल मंत्री राधाकृष्म विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी मुळात संजय राऊत कोण आहेत?

विखे पाटील

असा प्रश्न उपस्थित करत, त्यांच्या टीकेला उत्तर देण्याला आम्ही काही बांधिल नाही. असं म्हणत खासदार संजय राऊत यांना राधाकृष्ण विखे पाटील यांनी उडवून लावलं.खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने सरकारवर टीका केली जात असते. मात्र केंद्र आणि राज्य सरकार आपापली कामं करत असल्याचे सांगत. त्यांनी संभाजीनगर आणि औरंगजेबच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्यांनी या सरकारव टीका करू नये असा जोरदार हल्लाबोलही विरोधकांवर केला आला. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्याबद्दल वक्तव्य करून पहाटेचा शपथविधी शरद पवार यांना माहिती होता. असं वक्तव्य केले होते.त्याविषयीही बोलतानाही त्यांनी, देवेंद्र फडणवीस हे भाजपचे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी वक्तव्य करताना जबाबदारीनेच केले असणार असं म्हणत याबाबत शंका नाही.

असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसविषयी बोलताना सांगितले की, आताच्या काळात काँग्रेस पक्षाचं काय राहिले आहे. काँग्रेसला आता देशात काय भवितव्य असणार असं म्हणत त्यांनी काँग्रेसला मोडीत काढले आहे.त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण हे त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.

माजी मुख्यमंत्री म्हणूनही ते राज्याला माहिती आहेत.मात्र आता त्यांनी आता स्वतःच्या राजकीय अस्तित्वाचा विचार करायला हवा. कारण देशाने आणि जगाने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली एकदा त्यांनी काम करावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसवर टीका करताना त्यांनी सध्याच्या काळात काँग्रेसला कोणत्याही प्रकारचे राजकीय भवितव्य नाही. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांनी भाजपचा विचार करायला काय हरकत नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.