Home स्टोरी ओटवणे गावचे सुपुत्र वैभव कुमार जादू विशारद व जादू भूषण पुरस्काराने सन्मानित

ओटवणे गावचे सुपुत्र वैभव कुमार जादू विशारद व जादू भूषण पुरस्काराने सन्मानित

85

सिंधुदुर्ग: ओटवणे गावचे सुपुत्र तथा सुप्रसिद्ध जादूगार वैभव कुमार यांना पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय जादू परिषदेच्या सातव्या भारतीय जादू संमेलनामध्ये जादू विशारद व जादू भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्र गोवा कर्नाटकात बेळगाव कारवार येथे अनेक ठिकाणी जादूचे प्रयोग करून आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाने सिंधुदुर्गाचे नाव उज्वल केले. शालेय शिक्षण पूर्ण करून त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेऊन टू स्टार हॉटेल ते गोव्यातील ताज सारख्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये त्यांनी अल्पकाळासाठी नोकरी केली. परंतु त्यांचे नोकरीत मन रमेना. त्यांचे एकच ध्येय होते की, आपणाला कलेच्या माध्यमातून देश विदेशातील लोकांनी ओळखले पाहिजे. यासाठी कोणत्यातरी विशेष कलेत आपल्याला प्राविण्य मिळविले पाहिजे. त्याला लहान असताना त्यांच्या वडिलांनी अनेक जगप्रसिद्ध जादूगार रघुवीर, सुहानी, आनंद, पी सी सरकार, भैरव यांचे जादूचे प्रयोग दाखविले. त्यामुळे लहान असतानाच आपणाला ही महान जादूगार व्हायचे आहे अशी महत्त्वाकांक्षा त्यांनी त्यांचे वडील रामदास पारकर यांच्याकडे व्यक्त केली. त्यांच्या वडिलांचा सिंधू कलाकार मंच असून त्या माध्यमातून त्यांनी अनेक कलाकार घडविले. त्यातील अनेक कलाकार व्यावसायिक कलाकार बनून आपला चरितार्थ चालवीत आहेत.

जादूगार वैभव कुमार यांनी महान जादूगार बनण्यासाठी भारतात जिथे जिथे जादूचे प्रशिक्षण मिळते त्या ठिकाणी सुरत, बंगलोर, हैद्राबाद, सिकंदराबाद, मुंबई, पुणे, गोवा, देश विदेशातील जादू तज्ञांकडून जादूचे वर्कशॉप असतील तिथे जाऊन ही विद्या संपादन केली. आता त्याला परदेशात जाऊन पुढील शिक्षण घ्यावयाचे असून परदेशात देखील जादूचे कार्यक्रम करून सिंधुदुर्गाचे नाव उज्वल करायचे आहे.

जादूगार वैभव कुमार यांना घडवण्यासाठी जादूचे शिक्षक जागतिक प्रशिक्षक माननीय सतीश देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच रत्नागिरीतील जादूगार कस्तुरे आणि विनय राज, अवधुत तसेच ऑल इंडिया मॅजिशियन ग्रुपने पण त्यांना सहकार्य केले. आजवरच्या त्यांच्या यशस्वी कारकीर्दीत त्यांनी अंध, अपंग तसेच वृद्धाश्रम व ज्येष्ठ नागरिक यांच्या संस्थेसाठी विनामूल्य कार्यक्रम करून सामाजिक योगदान दिले. शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी जादूतून अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञानातून जादू, भोंदू बाबांचे चमत्कार या विषयातून जादू दाखवून समाज जागृतीचे कार्य केले. पाच वर्षाच्या मुलापासून ते नवोदितल्या ज्येष्ठ ना आवडणारे ते मनमिळाऊ जादूगार म्हणून प्रसिद्ध आहे. आज अनेक संस्थांनी त्यांना मानपत्र मानचिन्ह देऊन सन्मानित केले.

महाराष्ट्र अपंग मित्र फेलोषिप संस्था, ग्लोबल मालवणी संस्था मुंबई, विद्यार्थी विकास प्रशिक्षण अकॅडमी तर्फे राष्ट्रीय युवा जादुगार पुरस्कार, इंटरनॅशनल ह्यूमन राईट जस्टिस फेडरेशन संस्थेतर्फे महाराष्ट्र लोक गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार आजवर मिळाले. तसेच जिव्हाळा सेवाश्रम ट्रस्ट, भीमगर्जना बौद्ध मंडळ अशा महाराष्ट्र गोवा कर्नाटकातील अनेक संस्थांनी त्यांना आजवर सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मान केला. भावी काळात मुलांना मोबाईल गेमच्या विळख्यातून बाहेर काढून त्यांची अनेक ठीकाणी जादूची कार्यशाळा घेऊन त्यांना उत्कृष्ट निवेदक व जादूगार घडविण्याचा त्यांचा मानस आहे..