मुख्याध्यापिका शर्वरी सावंत यांचा अनोखा उपक्रम..
मसुरे प्रतिनिधी:
श्री.दाजीसाहेब प्रभूगावकर केंद्रशाळा मसुरे नं.1 येथे ऑन दि स्पॉट राखी बनविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.. या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला. स्पर्धेतील विजेते अनुक्रमे पुढील प्रमाणे…
इयत्ता पहिली /दुसरी:मधून निधी पेडणेकर, काव्या फरांदे,भार्गवी मोरे.
इ.तिसरीं/ चौथी: स्वानंदी हिंदळेकर, क्रिशा दुखंडे, अरुंधती चव्हाण, जयश्री जन्गले, सनम खान.
इ.पाचवी/सहावी: नंदिनी आंबेरकर,कोमल मोंडकर, मानसी मुळये, मानवी शिंगरे, मुस्कान खान, आर्या गावकर. इ.सातवी/आठवी:
श्रेया मगर, रिया भोगले, स्नेहा मसुरकर, अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवले आहेत. मुलग्यांमधूनही आवड म्हणून मिहीर मसुरकर, संकेत गोलतकर , समर्थ पाटकर यांनीही राख्या बनवून स्पर्धेचा आनंद लुटला.. विविध कल्पकता वापरून कला कौशल्याने सर्व मुलींनी राख्या बनवल्या.
या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या शेकडो राख्या प्रदर्शनासाठी मांडण्यात येऊन या राख्यांमधून मिळालेले उत्पन्न शालेय गरजांसाठी देण्यात आले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन सण राख्या बांधून उत्साहात साजरा केला.
यावेळी बोलताना मुख्याध्यापिका शर्वरी सावन म्हणाल्यात सर्वांचे कौतुक करावं तेवढं थोडे आहे. अतिशय कमी कालावधीमध्ये आपल्या अंगातील सुप्त गुणांना या विद्यार्थ्यांनी योग्य तो न्याय दिलेला आहे यासाठी सर्व मुलांचे मनःपूर्वक अभिनंदन.सर्व मुलीनी उत्कृष्ट राख्या बनवून उत्तम सहभाग घेतला. यावेळी मुख्याध्यापिका शर्वरी सावंत श्रीमती मगर मॅडम, विनोद सातार्डेकर, श्री गावडे सर, केंद्रप्रमुख नारायण देशमुख, शिपा शेख, हेमलता दूखंडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शितल मसुरकर, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, सन्मेष मसूरकर, श्री संतोष दुखंडे आणि ग्रामस्थ, पालक, शिक्षक वर्ग शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण विनोद सातार्डेकर श्रीमती रामेश्वरी मगर मॅडम, गोपाळ गावडे यांनी केले.