Home स्टोरी ऑन कॉल रक्तदाते संस्थेद्वारे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

ऑन कॉल रक्तदाते संस्थेद्वारे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

153

सावंतवाडी प्रतिनिधी: गोवा बांबुळी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल हे खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मोठा भाऊ आहे. नेहमी हे हॉस्पिटल मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असते आणि चांगले सहकार्यही केले जाते या मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून रुग्णांच्या सेवेबरोबर आरोग्य शिबिर तसेच रक्तदान शिबिरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात घेतली जात आहेत. ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग ही संस्था रक्तदान हे श्रेष्ठदान म्हणून कार्य करत आहे या संस्थेला गोवा येथील सार्थक फाउंडेशन व जेसीआय फाउंडेशन यांचे सहकार्य मिळत आहे. हे महान कार्य आहे. अशा शब्दात ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे जिल्हाध्यक्ष तथा सेवानिवृत्त पोलीस उपविभागीय अधिकारी दयानंद गवस यांनी स्पष्ट केले. सार्थक फाउंडेशनचे संयोजक सुदेश नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

ऑन कॉल रक्तदाते संस्थेला नेहमी सहकार्य केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले सावंतवाडी काझी शहाबुद्दीन हॉल येथे. आज रविवारी ११ मे रोजी ऑन कॉल रक्तदाते संस्था व गोवा येथील सार्थक फाउंडेशन, जेसीआय यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन सावंतवाडी संस्थांचे युवराज लखम राजे भोसले सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सौ अश्विनी पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे जिल्हाध्यक्ष दयानंद गवस, सार्थक फाउंडेशनचे संयोजकसुदेश नार्वेकर, गोवा येथील जेसीआय फाउंडेशनच्या सचिव सृष्टी लोटलिकर, सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे, महिला पोलीस अधिकारी सौ माधुरी मुळीक, विश्व हिंदू परिषद गोरक्षक जिल्हाध्यक्ष दिनेश गावडे, मल्ल सम्राट प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे ललित हरमलकर, दुर्गा गौतम सरनाईक, ऑन कॉल .संस्थेचे सचिव बाबली गवंडे, उपाध्यक्ष मीनल सावंत, खजिनदार सिद्धार्थ पराडकर, बाळकृष्ण राऊळ, सचिन कोंडी जितेंद्र पंडित, रवींद्र तावडे आधी उपस्थित होते. यावेळी रक्तदाते यांनी ऑन कॉल गोवा येथे जाऊन रक्तदान केल्याबद्दल त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी गिरीश सावंत, नितीन परब, समीर सावंत, सिद्धार्थ पराडकर, ओंकर कवठणकर, श्रीकृष्ण राऊळ, रवींद्र तावडे व ऑन कॉल रक्तदाते संस्था यांचा सार्थक फाउंडेशन च्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सार्थक फाउंडेशनचे श्री नार्वेकर म्हणाले जिल्ह्यातील नागरिकांसाठी आम्ही नेहमीच सहकार्य करण्याच्या भावनेत आहोत. ऑन कॉल रक्तदाते संस्था ही उत्कृष्ट कार्य करत आहे. त्यांचे अध्यक्ष व त्यांची सर्व टीम सेवाभावी वृत्तीने काम करत आहे. हे कौतुकास्पद आहे आणि त्यामुळेच आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत. असे ते म्हणाले. यावेळी युवराज लखम सावंत भोसले व मुख्याधिकारी सौ अश्विनी पाटील, सिताराम गावडे, सौ मूळीक आदींनी रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. ऑन कॉल रक्तदाते संस्था ही चांगले कार्य करत आहे. या संस्थेला सर्वांनी हातभार लावा. ही संस्था निश्चितच पुढील काळात मोठे यश संपादन करेल. एवढे त्यांचे कार्य चांगले आहे अशा शब्दात कौतुक केले. यावेळी मोठ्या संख्येने रक्तदान करण्यात आले.