Home स्टोरी एस. टी. भाड्यातील सवलतीचे कल्याण पूर्व शिवसेना महिला आघाडी कडून जल्लोषात स्वागत...

एस. टी. भाड्यातील सवलतीचे कल्याण पूर्व शिवसेना महिला आघाडी कडून जल्लोषात स्वागत !

175

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड ): – राज्य शासनाच्या राज्य परिवहन अर्थात एस .टी . प्रवासी वाहतुकीत लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी महिलांना प्रवासी भाड्यात शिंदे – फडणवीस सरकारने ५० टक्के सवलतीची घोषणा करून या घोषणेची त्वरीत अंमल बजावणीही सुरु करण्यात आली आहे . राज्य शासनाच्या या घोषणेचे कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण एस टी बस स्थानकात शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले .सत्ता स्थापने नंतर राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या नवनव्या योजना जाहिर करून कधी नव्हे ते जनतेला दिला देण्याचे काम करीत आहे . याच अंतर्गत राज्य शासनाच्या एस .टी . प्रवासी वाहतुकीमधून लांब पल्ल्याच्या मार्गांवर संपूर्ण राज्यभरातील काना कोपऱ्यात प्रवास करणाऱ्या महिलांची प्रवास खर्चातून आर्थिक बचत व्हावी या उद्देशाने महिला प्रवाश्यांना ५० टक्के सवलत देण्यात आली आहे.

या योजनेचा कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शाखा प्रमुख प्रशांत बोटे यांच्या नियोजनाने शनिवारी कल्पाण एस टी स्थानकावरून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाश्यांना पेढे वाटून जल्लोष करीत मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे आभार मानण्यात आले.

या समयी महिला जिल्हा प्रमुख पुष्पा ठाकरे यांचे सह माजी नगरसेविका सौ माधुरी प्रशांत काळे, संगिता गायकवाड, सुमेध हुमणे, सुनिल घेगडमल यांचे सह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .