Home स्टोरी एसपीके महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन..!

एसपीके महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन..!

157

बालिका दिन उत्साहात साजरा…!

सावंतवाडी: भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच महिला विकास कक्ष व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने बालिका दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी महिला विकास कक्षाच्या समन्वयक प्रा. सौ. नीलम धुरी व महिला विकास कक्षाच्या सर्व सदस्या, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. व्ही. आठवले (कनिष्ठ महाविद्यालय), कनिष्ठ महाविद्यालय समन्वयक प्रा. व्ही. पी. राठोड आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी याप्रसंगी उपस्थित होते.