Home स्टोरी एमपीएससीमार्फत ३७८ पदासाठी अर्ज ६ मार्चपासून प्रक्रिया सुरू

एमपीएससीमार्फत ३७८ पदासाठी अर्ज ६ मार्चपासून प्रक्रिया सुरू

77

एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा २०२२ आयोजित करण्यात आली आहे. याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी पात्रताधारक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. एमपीएससी यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये एकूण ३७८ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये वनक्षेत्रपाल, गट ब १३ जागा, उप संचालक, कृषि व इतर गट-अ ४९ जागा, तालुका कृषि अधिकारी व इतर, गट-अ १०० जागा, कृषि अधिकारी, कनिष्ठ व इतर, गट-ब ६५ जागा, सहायक अभियंता,स्थापत्य, गट ब, श्रेणी-२, १०२ जागा, सहायक अभियंता, विद्युत व यांत्रिकी, गट ब, श्रेणी-२, ४९ जागा भरण्यात येणार आहेत.शासनाच्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना दिनांक ६ मार्च २०२३ पासून ते २० मार्च २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. या परीक्षेसाठी अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई आणि पुणे परीक्षा केंद्र असणार आहे.