सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशुसंवर्धन आणि दूध उत्पादन वाढीच्या दृष्टीने गावातील विकास सोसायटीच्या माध्यमातूनच दूध संकलन करण्यात येणार आहे. तसेच एक गाव एक दूध संस्था असे काम यापुढे केले जाणार आहे. एका गावात दोन दोन दूध संस्था आणि त्यांना गोकुळने कोड देऊ नये. एका गावात एकच दूध संस्था असावी असे नियोजन यापुढे जिल्हा बँक व गोकुळच्या माध्यमातून केले जाणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी यांनी बैठकीत स्पष्ट केले. गाई म्हशी खरेदी संदर्भात जून पॅटर्न राबविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त गाई म्हशी खरेदी करून या जिल्ह्यात गावागावात दूध वाढीच्या दृष्टीने दूध शेतकऱ्यांची दर महिन्याला संयुक्त बैठकही घेण्यात येऊन दूध संस्था व शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ गोकुळ व दूध उत्पादक सहकारी संस्था प्रतिनिधी चेअरमन व सिंधुदुर्ग जिल्हा बँक यांची संयुक्त सभा सोमवारी आयोजित करण्यात आली होती. जिल्हा बँकेच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या सभेत जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी, व्हाईस चेअरमन अतुल काळसेकर, संचालक रवींद्र मडगावकर, समीर सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, गोकुळ चे दूध संकलन अधिकारी अनिल शिखरे,पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नितीन रेडकर विस्तार सुपरवायझर राजेश गावकर भगवान गावडे, डॉक्टर प्रसाद देवधर, सावंत तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे, कुणकेरी दूध संस्थेचे चेअरमन प्रमोद सावंत, कलंबिस्त दूध संस्थेचे चेअरमन ॲड संतोष सावंत, विष्णू तामाणेकर, रवींद्र मापसेकर, अनिल राऊळ, दीपक सावंत, दिनेश आंबेडकर, राजेश लोट, दिलीप सावंत, अभय परब, अंकुश म्हाडदळकर, नामदेव मडव, भिकाजी सावंत, सुधीर सावंत, अमोल तांबे, वासुदेव परब, सदाशिव परब, अनिल शिखरे, ज्ञानेश्व परब, श्रीकृष्ण भोसले, संतोष सामंत, विवेक शिरसाट, अमित जाधव, गणपत परब, वामन गाड, पांडुरंग ठाकूर, बाबुराव कविटकर, रविंद्र धावुस्कर, खेमा नाईक, सुनील गाड आधी उपस्थित होते.