Home राजकारण एकाच हातात घड्याळ पंजा आणि मशाल आहे! अजित पवार

एकाच हातात घड्याळ पंजा आणि मशाल आहे! अजित पवार

69

महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीत लढणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वज्रमुठ सभेत सांगितले. महाविकास आघाडीचा कणा असणारे कार्यकर्ते जीवाचे रान करतील, असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. आता पेटून उठावे लागेल, एकाच हातात घड्याळ पंजा आणि मशाल आहे. हा एकोपा टिकविण्यासाठी आम्ही जीवाचे रान करणार आहोत, आपणही एकोपा टिकवा, असे आवाहन त्यांनी केले. भाजप आणि शिंदे गटाच्या सरकार विरोधात राज्यभरात महाविकास आघाडीच्या १६ सभा होणार आहेत. त्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते.