Home स्टोरी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी परिसरामधील संरक्षण भिंत ठरू शकते अपघातास कारण!

उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी परिसरामधील संरक्षण भिंत ठरू शकते अपघातास कारण!

186

सावंतवाडी प्रतिनिधी: उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी परिसरामधील १५ फुट उंच चिऱ्याची संरक्षण भिंत पूर्णपणे हॉस्पिटल अपघात विभागाच्या दिशेने झुकलेली आहे. सदर चिऱ्याची भिंत त्या दिशेने पडल्यास मोठ्या प्रमाणात अनर्थ घडू शकतो. कारण अपघात विभाग असल्यामुळे लोकांची कायम वरदळ त्या ठिकाणी असते. तसेच वरच्या रस्त्याच्या बाजूला गोरगरिबांचे स्टॉल आहेत. ते हि स्टॉल हॉस्पिटलच्या दिशेने खाली कोसळू शकतात. याची दखल घेऊन सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते उद्या बांधकाम विभागाला निवेदन देऊन चिऱ्याच्या संरक्षण भिंती संदर्भात तात्काळ कार्यवाही करण्यासाठी आवाहन करणार आहे.