Home स्टोरी उद्योजक संदीप सावंत यांचा गावच्या वतीने सन्मान

उद्योजक संदीप सावंत यांचा गावच्या वतीने सन्मान

374

सावंतवाडी प्रतिनिधी: अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वेर्ले, कलंबिस्त शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर पुणे सारख्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचा परिचय घेऊन परिस्थितीशी झुंज देत पुढे गेल्यानेच आपण यशस्वी उद्योजक होऊ शकलो असे प्रतिपादन पुणे येथील सुप्रसिध्द उद्योजक संदिप सावंत यांनी श्रीदेव बादेकार ग्रामविकास मंडळ, वेर्ले तर्फे आयोजित सत्कार समारंभात सत्काराला उत्तर देताना केले. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे सल्लागार गोविंद लिंगवत, सामाजिक कार्यकर्ते धोंडी राऊळ, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत, गावकरी शंकर राऊळ भाटलेकार, श्री देव बादेकार ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष ज्ञानदेव लिंगवत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात श्रीदेव बादेकार ग्रामविकास मंडळ तर्फे उद्योजक संदिप सावंत, उद्योजक ज्ञानेश्वर सावंत, १४ वर्षा खालील वयोगटातील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत निवड झालेली स्नेहल राऊळ व प्रांजल राऊळ, शिक्षण परिषद मुंबई आयोजित काव्यं गायन स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेती श्रावणी घोगळे, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक कार्यकारी अभियंता पदावर रूजू झालेले भुषण राऊळ , गिर्यारोहण व किर्तनकार संदेश गोसावी यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यावेळी प्रसाद गावडे, संदेश गोसावी, सुनील राऊळ, शरद राऊळ, प्रकाश मर्गज, चिन्मय जड्ये, संतोष राऊळ, विजय गोसावी, अशोक गोसावी, सुजित राऊळ, रविंद्र मेस्त्री, सुरेश गावडे, अनिल गावडे, संदिप राऊळ, लाडजी राऊळ, चंद्रकांत राऊळ, हरी घोगळे, मयुर सावंत, यशवंत घाडी उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन संदेश गोसावी यांनी, स्वागत ज्ञानदेव लिंगवत यांनी तर आभार प्रदर्शन प्रसाद गावडे यांनी केले.