Home शिक्षण सातार्डा येथील प्रशालेत प्रा. रूपेश पाटील यांचे उद्या करिअर मार्गदर्शन.

सातार्डा येथील प्रशालेत प्रा. रूपेश पाटील यांचे उद्या करिअर मार्गदर्शन.

139

सावंतवाडी प्रतिनिधी:  सातार्डे मध्यवर्ती संघ, मुंबई संचलित महात्मा गांधी विद्यामंदिर हायस्कूल, सातार्डा येथे उद्या दिनांक ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व प्रेरणादायी वक्ते प्रा. रुपेश पाटील यांचे ‘चला घडवूया करिअर.!’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. या मार्गदर्शनाचा सातार्डा पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी व पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सातार्डे मध्यवर्ती संघ, मुंबई संस्थेचे अध्यक्ष अनिल तळवणेकर, कार्यवाह राजाराम आरोंदेकर, खजिनदार प्रदीप कवठणकर तसेच शालेय समितीचे अध्यक्ष नारायण (श्याम) हळदणकर, उपाध्यक्ष पंकज मेस्त्री, सदस्य अजित कवठणकर, दीपक नाईक, अमोल सातार्डेकर, शुभम पिळणकर,  शर्मिला मांजरेकर, सल्लागार ज्ञानेश्वर मांजरेकर तसेच मुख्याध्यापक प्रशांत सावंत , सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी केले आहे.