Home स्टोरी उद्या प्रभाग ड कार्यालया समोर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सामुहिक बुद्ध...

उद्या प्रभाग ड कार्यालया समोर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सामुहिक बुद्ध वंदना आणि संगितातून अभिवादन!

117

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): – भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल २० २३ या जयंती दिनाच्या पूर्व संध्येस कल्याण पूर्वेतील प्रभाग ड कार्यालयाच्या प्रांगणात सामुदायिक बुद्धवंदना आणि गित संगितातुन अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या विद्यमाने प्रभाग ड कार्यालयाच्या प्रांगणात उद्या रात्री ७ वाजता राजू सर्पे निर्मित आणि प्रबोधनकार विकास सोनावणे प्रस्तुत ‘ सुर्योदय क्रांतीचा ‘ हा बुद्ध भिम गीतांच्या प्रबोधनात्मक गित संगित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून रात्री ११ . ४५ ते ०० वाजे पर्यंत सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात येवून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिना निमित्त जयंती दिनाच्या पूर्वसंध्येस आयोजित करण्यात आलेल्या या सामुदायिक बुद्ध वंदना कार्यक्रमास तमाम आंबेडकर प्रेमी नागरीकांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन जयंती उत्सव समितीच्या वतीने अध्यक्षा आयु. सिंधुताई मेश्राम यांनी केले आहे .