कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड ) :- भारतीय संविधानाचे महत्व वाढण्याबरोबरच समाज मनात संविधानाप्रती किती प्रमाणात जागृकता आहे. याची पडताळणी करण्याच्या उद्देशाने विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती कल्याण पूर्व यांच्या विद्यमाने उद्या संविधान गौरव स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिना निमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत जयंती उत्सव समितीचे सर्व कोअर कमिटी सदस्य, समाज बांधव, विद्यार्थी वर्ग तसेच सर्वसामान्य नागरीकांनीही सहभाग घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचे आवाहन समितीच्या अध्यक्षा आयुष्यमती सिंधुताई मेश्राम आणि त्यांच्या सहकारी पदाधिकारी महिला वर्गाने एका पत्रकाद्वारे केले आहे. ही स्पर्धा सर्व वयो गटातील प्रवर्गसाठी खुली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : मो नं .- 93210 08755 / 98674 56250
Home स्टोरी उद्या कल्याण पूर्वेत ‘संविधान गौरव’ स्पर्धा परिक्षेचे आयोजन !सर्व प्रवर्गातील उच्छुकांना स्पर्धेत...