Home राजकारण उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करा हे मी सातत्याने सांगतोय! नितेश राणे

उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करा हे मी सातत्याने सांगतोय! नितेश राणे

79

१६ मे वार्ता: महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या दंगलींप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या कारवाईची मागणी केली आहे. यानंतर आज मंगळवार दि.१६ मे रोजी भाजपा नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन या दंगलींवरून गंभीर आरोप केले आहेत. नितेश राणे म्हणाले की, काल विरोधी पक्षनेते अजित दादांनी सांगितलं, या दंगलींचा मास्टमाईंड शोधा. मी दादांना सांगेन या दंगली होतायत त्याचा मास्टरमाईंड तुमच्या सिल्व्हर ओकवर (शरद पवार यांचं निवासस्थान) काही दिवसांपूर्वी आला होता. तुमच्यासोबत बसलेला. पवार साहेबांच्या बाजूच्या सोफ्यावर बसलेला. त्याचा पत्ता कलानगरमध्ये आहे. नितेश राणे यांनी या दंगलींचे सूत्रधार हे उद्धव ठाकरे असल्याचं म्हटलं आहे. कारण उद्धव ठाकरेंचं मातोश्री हे निवासस्थान वांद्रे येथील कलानगरमध्ये आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे सिल्व्हर ओकवर गेले होते. तिथे ते अजित पवारांच्या शेजारी बसले होते. आमदार नितेश राणे म्हणाले, मी वारंवार सांगतोय, दंगली घडवून स्वतः मुख्यमंत्री बनण्याची इच्छा ज्या सुप्त डोक्यातून आलेली. ती इच्छा आणि ते स्वप्न आजही मेलेलं नाही. उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करा हे मी सातत्याने सांगतोय. १९९३ च्या दंगलीनंतर १९९५ ला राज्यात शिवसेना-भाजपाची सत्ता आली असं म्हणणारे ठाकरे २००४ ला परत तोच प्रयत्न करत होते. असेही नितेश राणे म्हणाले