सावंतवाडी: मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभागीय उडान महोत्सवाचे आयोजन करण्याची जबाबदारी सावंतवाडी येथील देशभक्त शंकरराव गवसकर कॉलेजला देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या यादीत हे कॉलेज एक दर्जेदार कॉलेज म्हणून गणले जाते. त्यामुळे विद्यापीठाच्या उडान महोत्सवाची जबाबदारी दुसऱ्यांदा देण्यात आली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य यशोधन गवस यांनी ९ जानेवारी रोजी युवा महोत्सवात दिली.
या युवा महोत्सवात प्राचार्य गवस यांनी सांगितले उडान महोत्सव ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ले कुडाळ मालवण तालुक्यातील सर्व महाविद्यालय या महोत्सवात सहभागी होतील. हि जबाबदारी आपल्याला दुसऱ्यांना मिळत असल्याचे स्पष्ट केले…