Home क्राईम उज्जैनमधील बलात्कार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात!

उज्जैनमधील बलात्कार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात!

159

मध्यप्रदेश: देशाला हादरवणाऱ्या आणि माणुसकीला काळिमा फासणारे उज्जैनमधील बलात्कार प्रकरणात  एका रिक्षा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहकारी ऑटो चालकावर पुरावे लपवल्याचा आरोपही केला आहे.

 

उज्जैनमध्ये २५ सप्टेंबर रोजी एका १२ वर्षाच्या मुलीवर महाकाल पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली होती. या मुलीवर  बलात्कार झाल्यानंतर पीडित मुलगी जवळपास अडीच तास रक्तबंबाळ अवस्थेत मदतीसाठी दारोदार अर्धनग्नावस्थेत फिरत होती. पीडिता मदत मागत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि त्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी आता उज्जैन पोलिसांनी एका रिक्षा चालकाला अटक केली आहे.

आरोपी रिक्षाचालकाने पीडितेवर बलात्कार केला आणि नंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने गाडीचा नंबर बदलला. एवढेच नाही तर आरोपीने त्याचा मोबाईलही बंद केला. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि तांत्रिक पुराव्याच्या मदतीने आरोपीला अटक केली आहे. आरोपी भरत हा नानाखेडा परिसरात राहणारा असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिस अधीक्षक सचिन शर्मा यांनी सांगितले की, आरोपीला घटनास्थळी नेले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान तो खाली पडला आणि जखमी झाला, तर दोन पोलिसही हाणामारीत जखमी झाले. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी पुरावे लपवल्याप्रकरणी आरोपीच्या सहकारी रिक्षा चालकालाही सहआरोपी बनवले आहे.

पिडीत मुलगी घरच्यांशी भांडण करून आठवीतील विद्यार्थिनी सपनाने उज्जैन गाठले होते. त्यानंतर 25 सप्टेंबर रोजी दुपारी 3.00 ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत उज्जैनमधील सहा जणांशी तिचा संपर्क झाला होता. पहाटे चार ते पाचच्या दरम्यान तिच्यावर बलात्कार झाला. पोलिसांनी महाकाल पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला.

हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणण्यासाठी 28 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एसआयटी स्थापन करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा करत ऑटो चालकाला अटक केली.

या संपूर्ण प्रकरणात 14 किलोमीटरच्या परिघात सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले.पोलिसांनी तीन ऑटोचालकांसह 6 जणांची चौकशी केली.पुरावे लपवल्याप्रकरणी पोलिसांनी नीलगंगा पोलिस ठाण्यात आणखी एका ऑटोचालकाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा करत ऑटो चालकाला अटक केली.