Home स्टोरी ई स्टोअर इंडिया या नेटवर्क मार्केटिंग कंपनी मुळे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बऱ्याच...

ई स्टोअर इंडिया या नेटवर्क मार्केटिंग कंपनी मुळे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बऱ्याच लोकांची दुरावस्था!

681

स्टोअर इंडिया (वेदिक आयुर क्युअर ) या नेटवर्क मार्केटिंग कंपनी मुळे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बऱ्याच लोकांची दुरावस्था झाल्याची माहिती मिळत आहे. ई स्टोअर इंडिया कंपनीच्या विरोधात देवगड महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. देवगड पोलीस स्टेशन तसेच जिल्हाधिकारी यांना देवगड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ई स्टोअर इंडिया कंपनीवर कारवाई करण्यासाठी निवेदने सादर करण्यात आली आहेत. महत्त्वाचं म्हणजे ई स्टोअर इंडिया या कंपनीमध्ये गुंतवणूक करून पैसे तीन पट होणार अशी माहिती मिळाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बऱ्याच नागरिकांनी बँकांकडून, बचत गटांकडून आणि प्रायव्हेट फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊन ई स्टोअर इंडिया कंपनीमध्ये पैसे गुंतवलेले आहेत.

ई स्टोअर इंडिया कंपनीचे प्रमुख फैजान खान

गेल्या दीड वर्षापासून ई स्टोअर इंडियाचा कारभार काही योग्य पद्धतीने चालत नाही आहे. आणि नागरिकांचे घेतलेले पैसेहि परत मिळत नाहीत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक तारांबळ उडाली आहे. ई स्टोअर इंडिया कंपनीमधून तीन पट पैसे मिळणं तर बाजूलाच राहिलं पण घातलेली मुद्दल पण मिळत नाही आहे आणि आता ज्या बँकांकडून काही लोकांनी पैसे घेऊन ई स्टोअर इंडिया कंपनीमध्ये गुंतवले होते त्यांचे आता व्याजही वाढत आहे. आणि प्रायव्हेट फायनान्स कंपनीचे कर्मचारी, बचत गटांचे अधिकारी घेतलेल्या कर्जाच्या परत फेडीसाठी वारंवार लोकांकडे जात असल्यामुळे लोकांना आता अफाट त्रास सहन करावा लागत आहे. ई स्टोअर इंडियाचे प्रमुख फैजान खान हे गेल्या कित्येक महिन्यापासून भारतातून गायब होऊन दुबईमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. कंपनीच्या पुढे नेमकं काय होणार आहे? पैसे मिळणार की नाही? याबाबत कोणतही चित्र स्पष्ट होत नाही. तसेच ई स्टोअर इंडियाचे प्रमुख ऑनलाईन मीटिंग घेत कित्येक महिने फक्त पैसे मिळण्याची आश्वासनं देत असल्यामुळे कंपनीचे गुंतवणूकदार संताप व्यक्त करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ई स्टोअर इंडियाच्या जास्त जास्त लोकांनी कंपनीमध्ये चुकीच्या पद्धतीने काम केलं होतं. असं कंपनीचे प्रमुख तसेच कंपनीचे मुख्य लीडर यांचे म्हणणे आहे. कंपनीकडून सांगण्यात आलेल्या नियमांचं पालन न करता काही प्रमुख लीडर लोकांनी पैसे कमवण्यासाठी खोटी आश्वासने देऊन जिल्ह्यातील नागरिकांकडून पैसे उचल केली आणि ई स्टोअर इंडिया कंपनीकडे दिली. अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे आज ईस्टर इंडिया मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकांची दुरावस्था आहे. याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना ऑगस्ट महिन्यापासून आक्रमक आहे. आणि आता देवगड तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे पदाधिकारी ई स्टोअर इंडिया कंपनी आणि काही फायनान्स कंपन्याबाबत देवगड पोलीस स्टेशन तसेच जिल्हाअधिकाऱ्यांकडे कारवाईसाठी निवेदन दिली आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ई स्टोअर इंडिया मध्ये काम करणारे काही प्रमुख लीडर ई स्टोअर इंडियाचे काम सोडून आता नवीन मार्केटिंग कंपन्यांमध्ये काम करत असल्यामुळे जिल्ह्यातील गुंतवणूकदारांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

देवगड मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

नेटवर्क मार्केटिंग मध्ये गेल्या दहा वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बऱ्याच कंपन्या बंद झाल्यामुळे बऱ्याच नागरिकांना नुकसान सहन करावे लागले आहे. तरी पण अशा नवीन येणाऱ्या कंपन्यांमध्ये नागरिक पुन्हा पुन्हा गुंतवणूक करतात आणि आपण स्वतःची फसवणूक स्वतःच करून घेतात असं काही लोकांचं म्हणणं आहे. आता नेमकं पुढे काय होणार आहे? ई स्टोअर इंडिया कंपनीचे काय होणार आहे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.