सिंधुदुर्ग: १४ फेब्रुवारी २०२४ रोजी देवगड पोलीस स्टेशन येथे ई स्टोअर इंडिया कंपनी चे मालक आणि कंपनीत काम करणाऱ्या सात व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्हे दाखल करण्यासाठी चैतन्या चेतन तारकर ह्या महिलेने पोलीस स्टेशन ला तक्रार दिली होती. याबाबत पत्रकार प्रसाद परब यांनी देवगड पोलीस स्टेशन येथील पोलिसांचा हा तपास पूर्णपणे चुकीचा आहे. तसेच हा तपास योग्य पद्धतीने झालेला नसून चुकीच्या पद्धतीने कंपनीमध्ये काम करणाऱ्या सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे हा तपास योग्य पद्धतीने करण्यात यावा असं निवेदन देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिलं आहे.
देवगड पोलिसांचा तपास चुकीचा कसा? याबाबत सरविस्तर माहिती अशी की, देवगड पोलीस स्टेशनला ज्या चैतन्य चेतन तारकर या महिलेने तक्रार दिली. ही महिला सुद्धा ई स्टोअर इंडिया कंपनीमध्ये काम करणारी एक लीडर आहे. चैतन्या चेतन तारकर हिने सुद्धा कंपनीमध्ये काम करून लाखो रुपये कमवलेले आहेत. चैतन्य चेतन तारकर या महिलेला ई स्टोअर इंडिया कंपनी मध्ये काम करण्यासाठी आणणारे लीडर वेगळेच आहेत. त्यामुळे ई स्टोअर इंडिया कंपनीमध्ये ज्या लीडरांनी चैतन्या चेतन तारकर ह्या महिलेला आणलं त्या व्यक्तींवर गुन्हे दाखल होणं प्रथम गरजेचं होतं. पण तसं न व्हता चुकीच्या पद्धतीने इतर सात व्यक्तींवर नाहक गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे तपास चुकीच्या पद्धतीने झाला असं म्हणायला काही हरकत नाही. ई स्टोअर इंडिया या नेटवर्क मार्केटिंग मध्ये साखळी पद्धतीने काम होत आहे. मग साखळी पद्धतीने काम झालं झालं असतांना किंवा होत असतांना चैतन्या तारकर हिला कोणी बिझनेस मध्ये आणलं? हे सर्वात महत्त्वाचं होतं. त्यानुसार जर गुन्हे दाखल करायचे होते तर चैतन्या चैतन्य तारकर ह्या महिले सोबतच वरच्या लेवलला जे कोणी व्यक्ती काम करत होते त्या सर्व व्यक्तींवर गुन्हे दाखल होणं गरजेचं होतं किंवा कोणावरच गुन्हे दाखल न होता कंपनीचे प्रमुख एमडी फैजान खान यांच्यावर गुन्हा दाखल होणे गरजेचे होते. चैतन्य चेतन तारकर हिच्या वरच्या लेवल मध्ये सीमा लंगोटे, ज्योती जाधव आणि मिताली केळुसकर या प्रमुख महिला लीडर आहेत, ज्यांनी ई स्टोअर इंडिया कंपनीमध्ये काम करून लाखो रुपये कमवले आहेत. असं असताना या तिन्ही महिलांना वगळून ई स्टोअर इंडिया कंपनी मध्ये काम करणाऱ्या थेट वरील सात व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे हा तपास चुकीचा आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

या सर्व प्रकाराबाबत १७ मे २०२४ रोजी देवगड पोलीस स्टेशनला पत्रकार प्रसाद परब आणि ई स्टोअर इंडिया कंपनी मध्ये काम करणाऱ्या अनेक व्यक्तींनी देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर यांना सर्व प्रकरणाची सरविस्तर माहिती देऊन कंपनीच्या मालकांसोबत कंपनीमध्ये काम करणाऱ्या सात व्यक्तींवर जसे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे कंपनीमध्ये काम करणाऱ्या सीमा लंगोटे, ज्योती जाधव, मिथाली केळुसकर आणि स्वतः तक्रार देणारी तक्रार देणारी महिला लीडर चैतन्य तारकर हिच्यावर सुद्धा योग्य तो तपास करून ज्याप्रमाणे सात व्यक्तींवर गुन्हे दाखल कारण्यात आले आहेत, तसेच गुन्हे तात्काळ दाखल करण्यात यावे. किंवा कंपनीमध्ये काम करणाऱ्या कोणावरच गुन्हे दाखल न होता कंपनीचे मालक फैजान खान यांच्यावरच गुन्हा दाखल करून कोकणातील सामान्य नागरिकांचे पैसे मिळवून देण्यासाठी पोलिसांनी योग्य ती मदत करावी असे निवेदन देण्यात आले. याबाबत देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर यांनी लवकरात लवकर योग्य ते तपास होईल आणि जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. असे आश्वासन दिले. त्यामुळे आता सीमा लंगोटे, ज्योती जाधव, मिथाली केळुसकर आणि तक्रार देणारी चैतन्य चेतन तारकर यांच्यावर कोणत्या प्रकारे कारवाई होणार? तसेच ई स्टोअर इंडिया या कंपनीत काम करणाऱ्या प्रमुख सीमा लंगोटे, ज्योती जाधव, मिथाली केळुसकर आणि चैतन्य तारकर यांच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल झाले नाही तर १४ एप्रिल २०२४ रोजी कंपनीमध्ये काम करणाऱ्या ज्या सात व्यक्तींवर गुन्हे दाखल झाले आहेत, हे गुन्हे रद्द होणार आहेत काय? याकडे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
एकंदरीतच कायदा हा सर्वांसाठी समान आहे. त्यामुळे कंपनीत काम सात व्यक्तींवर ज्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे, त्याप्रमाणे याच कंपनीत काम करणाऱ्या सीमा लंगोटे, ज्योती जाधव, मिथाली केळुसकर आणि स्वतः तक्रार देणाऱ्या महिला चैतन्या चेतन तारकर हिच्यावर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे.