मुंबई: इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करून पोलीस शिपाई पदासाठीच्या भरतीच्या लेखी परीक्षेत नक्कल करतांना काही विद्यार्थी आढळले. त्यांच्या विरोधात मुंबईतील भांडुप, गोरेगाव, कस्तुरबा मार्ग आणि मेघवाडी पोलीस ठाणे येथे ४ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.१. परीक्षेच्या वेळी एका परीक्षार्थीची हालचाल संशयास्पद आढळल्याने त्याची झडती घेतली असता त्याच्या कानात काहीतरी उपकरण आढळले. त्याने मनगटापासून कोपर्यापर्यंत सनग्लोज घातले होते. त्यात सिमकार्ड, चार्जिंग सॉकेट, मायक्रो माइक असलेले सिम कार्डसदृश इलेक्ट्रॉनिक उपकरण सापडले. त्यानंतर आधुनिक वैद्यांकडे नेऊन त्याच्या कानात लपवलेले इअरबड काढण्यात आले. या परीक्षार्थीला अटक करण्यात आली असून त्याचे नाव युवराज जारवाल (वय १९ वर्षे) आहे.२. रवींद्र काळे (वय ३३ वर्षे) हा परीक्षार्थी ‘मोबाइल पेन’मध्ये सीमकार्ड घातलेल्या उपकरणातून मित्रासमवेत बोलतांना आढळला. रवींद्र याला नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.३. नितेश आरेकर या परीक्षार्थीला इलेक्ट्रॉनिक्स उपकरण आणि सीमकार्डसह पकडण्यात आले. तोही एका व्यक्तीच्या संपर्कात होता. त्यालाही नोटीस देऊन सोडण्यात आले.४. बबलू मेंढरवाल (वय २४ वर्षे) आणि नितेश आरेकर (वय २९ वर्षे) हे परीक्षार्थी कानात सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करून नक्कल करत होते. त्यांच्या विरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला
Home क्राईम इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करून नक्कल केल्याप्रकरणी ४ गुन्हे नोंद! मुंबई येथे झालेल्या...