Home शिक्षण इंग्लिश मिडियम स्कूल तळवडे प्रशालेच्या विद्यार्थी परिषदेचा पद्ग्रहण समारंभ उत्साहात साजरा.

इंग्लिश मिडियम स्कूल तळवडे प्रशालेच्या विद्यार्थी परिषदेचा पद्ग्रहण समारंभ उत्साहात साजरा.

70

तळवडे प्रतिनिधी: येथील गुरुवर्य बी. एस. नाईक मेमोरियल ट्रस्ट सावंतवाडी संचलित इंग्लिश मिडिलम स्कूल तळवडे प्रशालेच्या विद्यार्थी परिषदेचा पदग्रहण समारंभ -दिनांक १० जुलै २०२५ रोजी उत्साहाच्या वातावरणात पार पडला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे पदाधिकारी श्री.सतीश बागवे, प्रशालेच्या कार्यकारी अधिकारी सौ. मैथिली मनोज नाईक, मुख्याध्यापक श्री.अजय बांदेकर, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक उपस्थित होते.

यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे श्री.सतीश बागवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षक, विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.