Home स्टोरी आ. वैभव नाईक यांच्या हस्ते मठ-कुडाळ पणदूर घोटगे रस्त्याचे भूमिपूजन…!

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते मठ-कुडाळ पणदूर घोटगे रस्त्याचे भूमिपूजन…!

465

बजेट २०२०-२१ अंतर्गत मठ-कुडाळ पणदूर घोटगे रस्त्यासाठी ३ कोटी ६० लाख रु. मंजूर.

 सिंधुदुर्ग: आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून बजेट २०२०-२१ अंतर्गत मठ-कुडाळ-पणदूर-डिगस- जांभवडे -घोटगे रस्ता रा. मा.१७९ मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे यासाठी ३ कोटी ६० लाख रु. मंजूर करण्यात आले आहेत. जांभवडे येथे शनिवारी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. ८ दिवसांपूर्वी पणदूर डिगस येथून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली असून तेथून घोटगे पर्यंत हा रस्ता सुस्थितीत केला जाणार आहे. आ. वैभव नाईक यांनी ग्रामस्थांची ही मागणी पूर्ण केल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.

यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख महेश सावंत,विभाग संघटक पी. डी. सावंत,काशीराम घाडी, दीपक घाडी, माजी सरपंच बांदेकर,भावेश परब,तेजस भोगले,चंदन ढवळ,गुरु मेस्त्री,उदय मडव,रुपेश घाडीगावकर आदींसह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.