सिंधुदुर्ग : आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना मसुरे विभागाच्या वतीने कांदळगाव श्री. रामेश्वर मंदिर येथे २६ मार्च रोजी सकाळी १० वाजता अभिषेक करण्यात येणार आहे. आमदार वैभव नाईक यांच्या रूपाने कुडाळ मालवण तालुक्याला लाभलेले एक आश्वासक नेतृत्व व त्यांच्या माध्यमातून सुरू असलेला मतदारसंघाचा विकास याला प्रेरित होऊन कांदळगाव वासियांनी कांदळगाव ग्रामपंचायतीत शिवसेनेची सत्ता आणली.आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कांदळगावातही विकास कामे मार्गी लावली जात आहेत. मसुरे विभागाच्या वतीने आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कांदळगाव येथील श्री. रामेश्वर मंदिर येथे २६ मार्च सकाळी १० वाजता अभिषेक करण्यात येणार आहे. तरी यावेळी मसुरे विभागातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन विभागप्रमुख राजेश गावकर व कांदळगाव सरपंच रणजीत परब यांनी केले आहे.
Home स्टोरी आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मसुरे विभागाच्या वतीने कांदळगाव श्री. रामेश्वर मंदिरात...