Home स्टोरी आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून मसुरे गावात ३२ लाखांच्या विकास कामांची...

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून मसुरे गावात ३२ लाखांच्या विकास कामांची भूमिपूजने!

104

मसुरे प्रतिनिधी: (पेडणेकर): कुडाळ मालवणचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मसुरे -मर्डे ग्रामपंचायत हद्दीतील मसुरे-चांदेर ब्राम्हणदेव मंदिर रस्त्यासाठी निधी ५ लाख, कावातर ते हुऱ्हास रस्त्यासाठी निधी ७ लाख, मर्डे गिरकरवाडी धूपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी निधी १० लाख, मसुरे, मसदे,विरण, रस्त्यावर उसलाटवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यासाठी निधी ५ लाख, खाजणवाडी ते खोत जुवा रस्त्यासाठी निधी ५ लाख हि कामे मंजूर केली असून शुक्रवारी या कामांची भूमिपूजने आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत गावातील लोकप्रतिनिधी व जेष्ठ ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. गेली काही वर्षे हि कामे प्रलंबित आहेत. आ. वैभव नाईक यांनी प्रलंबित विकास कामे मंजूर करण्याचा शब्द ग्रामस्थांना दिला होता. यासाठी संग्राम प्रभुगावकर, छोटू ठाकूर,संदीप हडकर, पिंट्या गावकर यांनी विशेष पाठपुरावा केला होता.त्यानुसार आमदार वैभव नाईक यांनी दिलेला शब्द पुरा करत विकास कामांसाठी भरघोस निधी मंजूर केला आहे.त्याबद्ल ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत.

यावेळी सरपंच संदीप हडकर, उपसरपंच पिंटू गावकर, राजा कोरगावकर, सचिन पाटकर, जगदीश चव्हाण, रामराज सावंत, राघवेंद्र मुळीक, पंढरीनाथ मसुरकर, जीवन मुणगेकर, साबाजी हडकर, दीपक कातणकर, अरुण गिरकर, समीर वस्त, विष्णू गिरकर, आशिष खोत, संजय पेडणेकर, मनीषा वस्त, सान्वी हडकर, यशस्वी कातणकर, जान्हवी गिरकर, नरेन हिदळेकर, तुळशीदास पेडणेकर, कृष्णा पाटील, समीर पेडणेकर, अशोक भोगले, तात्या मुळीक राजा मुळीक, बाळा मसुरकर, बाबू पारकर,आशिष खोत, आदींसह मर्डे, कावा,ऊसलाट वाडी, जुवा, तळणी वाडी, चांदेर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापुढेही मसुरे येथील विकासात्मक कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील असे आश्वासनही आमदार वैभव नाईक यांनी यावेळी बोलताना दिले.

फोटो: मसुरे येथे विकासात्मक कामाचे भूमिपूजन करताना ज्येष्ठ ग्रामस्थ तुळशीदास पेडणेकर सोबत आमदार वैभव नाईक आणि मान्यवर….