१८ जून वार्ता: आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झाली होती. शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत आदेश दिले होते. त्यानंतर आज रविवार दि.१८ जून रोजी आशिष देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपुरात भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मी कुठल्याही पदाची मागणी केली नाही. मी कार्यकर्ता म्हणून आणि पक्ष जी जबाबदारी देईल ते करत राहणार आहे. श्रद्धा आणि सबुरीनेच माझी पुढील राजकीय वाटचाल राहील. माझी राजकीय वाटचाल कोण्या एका मतदारसंघासाठी केली नाही. विदर्भाच्या हितासाठी मी काम करणार आहे. २००९ मध्ये नितीन गडकरी प्रदेशाध्यक्ष असताना माझा प्रवेश भाजपामध्ये झाला होता. पश्चिम नागपूरमधून मला उमेदवारी देऊ केली होती. नितीन गडकरी माझ्यासाठी पितृतुल्य आहे. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. पक्षातील पुढील वाटचाल संयमाने श्रद्धा आणि सबुरीने राहणार आहे. असं आशिष देशमुख म्हणाले.







