Home स्पोर्ट आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची तब्बल १०७ पदकांची कमाई.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची तब्बल १०७ पदकांची कमाई.

142

८ ऑक्टोबर वार्ता: भारताने प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत तब्बल १०७ पदकांची कमाई करत इतिहासात  मोठं यश मिळविले आहे. या १०७ पदकांमध्ये २८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ४१ ब्राँझपदकांचा समावेश आहे. खेळाडूंच्या या अभूतपूर्व यशाबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी खेळाडूंचे स्वागत केले आहे. स्वतः पंतप्रधान मोदी हे पदकविजेत्या खेळाडूंसोबत संवाद करणार असल्याचे समजते.

या स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी सहा सुवर्ण, चार रौप्य आणि दोन ब्राँझपदकांची कमाई केली. तिरंदाजी, महिला पुरुष कबड्डी, क्रिकेट बॅडमिंटन दुहेरी अशा सुवर्णपदकांनी आजचा दिवस गाजला. यजमान चीनने सर्वाधिक ३७९ पदके मिळवून आपला अव्वल क्रमांक कायम ठेवला. जपान आणि कोरिया अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहिले.