Home राजकारण आमदार गेले असतील, पण आमदार म्हणजे शिवसेना नाही! संजय राऊत

आमदार गेले असतील, पण आमदार म्हणजे शिवसेना नाही! संजय राऊत

224

सिंधुदुर्ग: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सध्या जळगाव दौऱ्यावर आहेत. उद्या जळगावमधील पाचोऱ्यात शिवसेनेची सभा होणार आहे. यानिमित्त संजय राऊत जळगाव दौऱ्यावर असून त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. काल बातमी होती की, उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी शिंदे गट आक्रमक झाले होते. पण संजय राऊत यांनी हे साफ खोटे असल्याचे सांगितले.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?….रेल्वेच्या प्लॅटफॉमवर शिवेसेनेची एवढी गर्दी उसळली होती. त्यामुळे त्यांच्या गटातील कोणी धाडस केले असेल असं मला वाटत नाही. शेवटी शिवसेना ही मूळ शिवसेना आहे. त्यांनी चोऱ्या-माऱ्या केल्या, लफंगेगीरी केली, निवडणूक आयोगाला बोगस कागदपत्रे तयार करून दिल्यामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण निवडणूक आयोगाने त्यांच्या हातात दिले आहे. पण तसे असेल तरी जळगावातली शिवसेना ही मूळ शिवसेना, शिवसैनिक, पदाधिकारी सर्व इथे आहेत, उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत.

आमदार गेले असतील पण आमदार म्हणजे शिवसेना नाही, खासदार म्हणजे शिवसेना नाही. आमदार आणि खासदार यांच्या संख्येवर शिवसेना कोणाची आहे हे निवडणूक आयोगाने ठरवले असेल तर २०२४ ला याचा पराभव होईल तेव्हा निवडणूक आयोग पुन्हा आम्हाला शिवसेना देणार का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, जळगावातील शिवसेना आमच्या सोबत आहे. निवडणूक आयोगाने कोणत्याक्षणी निवडणूक विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक घेतल्यास जळगावातील लोक आम्हाला जिंकवून देतील. असं खासदार संजय राऊत म्हणाले.