Home स्टोरी आना भोगले यांना ओरोस जिल्हा विशेष न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

आना भोगले यांना ओरोस जिल्हा विशेष न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

133

सिंधुदुर्ग: कुडाळ पंचायत समितीच्या एका शाखा अभियंत्याने सामाजिक कार्यकर्ते व मराठा समाजाचे नेते आनंद कृष्णा भोगले यांच्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत व सरकारी कामात अडथळा आणल्या बाबत दिनांक ९ मार्च २०२३ रोजी गुन्हा दाखल केलेला होता. सदर गुन्हा दाखल केल्यामुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडालेली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासामध्ये एका शासकीय कर्मचाऱ्यांने सामान्य जनते विरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्याचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ होती. आना भोगले हे सामाजिक कामात कामाच्या निमित्त पंचायत समिती कुडाळ येथे शाखा अभियंतांच्या कार्यालयात गेले असता त्या ठिकाणी संबंधित शाखा अभियंता व आना भोगले यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडालीआना भोगले यांनी सदर केस दाखल केल्यानंतर विशेष जिल्हा न्यायाधीश सिंधुदुर्ग ओरस यांचे न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनाची मागणी करण्याकरिता अर्ज दाखल केला. सदरचा अर्ज हा मे. न्यायालयाने मंजूर केला व अना भोगले यांना अटक केल्यास यांची रक्कम रुपये २५ हजाराच्या जामिनावर मोकळी करण्याचा आदेश तपास अधिकारी यांना केला. आना भोगले यांना सदरचा जामीन हा सशर्त मंजूर झालेला आहे. आना भोगले यांच्या वतीने एडवोकेट सुहास सावंत, एडवोकेट नीलांगी रांगणेकर, एडवोकेट उमा सावंत, एडवोकेट चित्रा खोर्जवेकर, एडवोकेट रसिका सावंत यांनी काम पाहिले.