Home स्टोरी आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ग्रामपंचायत हरकुळ बुद्रुक वतीने “मेरी मिट्ठी-मेरा देश”...

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ग्रामपंचायत हरकुळ बुद्रुक वतीने “मेरी मिट्ठी-मेरा देश” अभियान चे आयोजन

152

गटविकास अधिकारी मा.श्री. अरुण चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

कणकवली: आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ग्रामपंचायत हरकुळ बुद्रुक च्या वतीने “मेरी मिट्ठी-मेरा देश” अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत तर्फे करण्यात आले होते. यावेळी गावचे माजी सैनिक मा. दिवाकर पेडणेकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आळे. तसेच क्रांतिदिनाचे औचित्य साधत हरकुळ गावचे शूरवीर भूमिपुत्र कै. लेफ्टनंट सुरेश गजानन सामंत यांच्या स्मृतीस्तंभ-शिलाफलकाचे अनावरण गटविकास अधिकारी कणकवली मा. श्री. अरुण चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. व वसुधा वंदन या उपक्रमांतर्गत 75 प्रकारच्या देशी वृक्षांची लागवड उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आली.



तसेच ल.गो. सामंत विद्यालयाच्या विदयार्थ्यांनी मानवाकृती 75 या अंकाद्वारे अमृत महोत्सवी शुभेच्छा दिल्या व शूरवीरांना वंदना म्हणून 75 दीप प्रज्वलीत करून सर्वांनी पंचप्राण शपथ घेतली. हरकुळ बुद्रुक गावातील शहिद जवान, स्वातंत्रसैनिक, माजी स्वातंत्रसैनिक यांचा व त्त्यांच्या कुटूंबीयांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी गावातील ग्रामस्थ, शालेय विदयार्थी, शिक्षक उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी मा. अरुण चव्हाण, सरपंच आनंद ठाकूर, उपसरपंच आयुब पटेल, माजी उपसभापती मा. बाबासाहेब वर्देकर, बुलंद पटेल, ग्रामविस्तार अधिकारी मा. कवटकर, शालेय समिती अध्यक्ष मा. ओमप्रकाश ताम्हाणेकर, पोलीस पाटील संतोष तांबे, दिवा पारकर, नित्यानंद चिंदरकर, ग्रामपंचायत सर्व सदस्य, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते व गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.