Home स्टोरी आजच्या दिवसाची सुरुवात एका चांगल्या विचाराने! जय जय रघुवीर समर्थ! श्लोक क्रमांक...

आजच्या दिवसाची सुरुवात एका चांगल्या विचाराने! जय जय रघुवीर समर्थ! श्लोक क्रमांक ३ आणि अर्थ!

154

प्रभाते मनी राम चिंतीत जावा,

पुढे वैखरी राम आधी वदावा,

सदाचार हा थोर सांडू नये तो,

जनीं तोची तो मानवी धन्य होतो ||३||

अर्थ: पहाट झाल्यावर श्रीरामाचे स्मरण करावे आणि नंतर श्रीरामाचे नाव उच्चारावे. सद्वर्तन थोर असते ते सोडू नये. कारण सदाचारी माणूसच सर्व जनांमध्ये धन्य होतो. सकाळी उठताक्षणी तू मनामध्ये श्रीरामाचे चिंतन कर आणि नंतर दिवसभरातही तुझ्या बोलण्यामध्ये सर्वप्रथम रामाचा उल्लेख असू दे. हा नित्याचा परिपाठ ठेव. सोडू नकोस. कारण असा परिपाठ ठेवणारा माणूस धन्य होतो, समाधानी होतो.

जय जय रघुवीर समर्थ!