Home स्टोरी आजच्या डिजिटल युगात संस्कारित मुलं घडवण्यासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या सुप्रसिद्ध लेखक मनोज अंबिके...

आजच्या डिजिटल युगात संस्कारित मुलं घडवण्यासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या सुप्रसिद्ध लेखक मनोज अंबिके यांनी लिहिलेली आणि बेस्टसेलर ठरलेली चार पुस्तकं

105

कागदाचं रूपांतर रद्दी पेपरमध्ये की सर्टिफिकेटमध्ये करायचं, हे पालकांच्या हातामध्ये असतंच. परंतु या कागदामध्येसुद्धा स्वतःला आकार द्यायची, सर्टिफिकेटमध्ये रूपांतरीत होण्याची शक्ती उपलब्ध असते. ज्या मुलांना त्यांच्या पालकांकरवी, शिक्षकांकरवी या शक्तीची, सामर्थ्याची जाणीव करून दिली जाते त्यांना कुठल्याही सर्टिफिकेटवर स्वतःचं नाव छापणं, हे सोपं जातं.आजच्या डिजिटल युगात संस्कारित मुलं घडवण्यासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या सुप्रसिद्ध लेखक मनोज अंबिके यांनी लिहिलेली आणि बेस्टसेलर ठरलेली चार पुस्तकं आहेत. ही पुस्तकं पालक, आजी-आजोबा, शिक्षक आणि इतर सर्वांसाठी खूपच महत्वाची आहेत. पुस्तकांविषयी माहिती.

१)कानमंत्र आई-बाबांसाठी- मुलांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडविण्याचे रहस्य)लेखक – मनोज अंबिकेपाने: १९२ किंमत: २२५/-आवृत्ती:- ३३: मुलांचे मन हे कोऱ्या कागदासारखे असते. आई-वडील जे चित्र काढतील तेच त्यावर उमटते. चांगला कलाकार माती ओली असतानाच जसा त्याला सुरेख आकार देतो तसेच जाणकार पालक मुलांच्या मनावर कायमस्वरूपी संस्कार करू शकतात. कानमंत्र आई बाबांसाठी या पुस्तकात लेखक मनोज अंबिके यांनी संस्कारित मुलं घडवण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.या पुस्तकातील काही मुद्दे, मुलांचे व्यक्तिमत्त्व कसे घडवावे?, मुलांच्या मनातले ओळखायचे तंत्र, मुलांच्या शक्तीला दिशा कशी द्यावी? मुलांना वेळ कसा द्यावा? मुलांच्या वागणुकीत बदल कसा घडवावाया?आणि अशा अनेक विषयांवर सखोल मार्गदर्शन करणारे हे पुस्तक. आहे.

२) मुलांची बुद्धिमत्ता विकसित करण्याच्या २१ पद्धती- (बुद्धिमत्ता, स्वभाव आणि विचारशैली यांना पैलू पाडण्यासाठी) लेखक – मनोज अंबिके: पाने: २४८ किंमत: २८०/- आवृत्ती:- १८: मुलांची बुद्धिमत्ता विकसित करण्याच्या २१ पद्धती हे पुस्तक केवळ बुद्धिमत्तेवरच भाष्य करत नाही तर मुलांच्या संपूर्ण विकासावरच भाष्य करतं. मुलांचा संपूर्ण विकास करणं म्हणजे त्यांचा बौद्धिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक विकासही होणं आवश्यक आहे. हे पुस्तक मदत करेल, तुमचं मूल कसं आहे हे ओळखण्यासाठी. प्रत्येक मूल हे वेगळं आहे असं जरी म्हटलं जात असलं तरीसुद्धा मुलांचे काही प्रकार या पुस्तकात दिले आहेत. आपलं मूल कुठल्या प्रकारात येतं हे जर समजलं तर आपल्या मुलांची बलस्थानं तुम्हाला आपोआप समजतील. ज्या वेळेस मुलांची बलस्थानं समजतील त्या वेळेस मुलांची आकलनशक्ती कशी वाढवायची, मुलांची विचारसरणी कशी विकसित करायची, मुलांच्या स्वभावाची गाडी योग्य रुळावरून कशी पुढे न्यायची, त्याचबरोबर मुलांवर ताण कसा येतो हेही या पुस्तकातून समजेल. जगात यश मिळविण्यासाठी बुद्धिमत्ता चांगली असायलाच हवी, स्वभाव चांगला असायला हवा, त्याचबरोबर मुलांच्या सवयींवर काम होणंसुद्धा आवश्यक आहे. म्हणूनच या पुस्तकात शेवटी २१ अशा सवयी देण्यात आल्या आहेत ज्यांचा वापर मुलांनी आपल्या आयुष्यात करायला सुरुवात केली तर त्यांचा भविष्यकाळ नक्कीच चांगला जाईल. पुस्तकातील महत्त्वाचे मुद्दे…. मुलांचा स्वभाव कसा ओळखावा? हायपर मुलांच्या ऊर्जेचे नियोजन, मुलांची बुद्धीमत्ता कशी वाढते?मुलांचा वैचारिक, भावनिक विकास, मुलांना निगोसिएशन शिकवा, मुलांच्या स्मरणशक्तीचा विकास, सेल्फ स्टडीचे तंत्र, मुलांची विचारशैली कशी विकसित करायची?

३) मुलांसाठी १०१ प्रभावी सवयी! (मुलांच्या जीवनाला आकार देणार्‍या सवयी) लेखक – मनोज अंबिके: पाने: २१६: किंमत: २५०/-: आवृत्ती:- १३: माणूस सवयी बनवतो परंतु नंतर त्या सवयीच माणसाला घडवतात किंवा बिघडवतात. खरं तर चांगल्या सवयी स्वतःला लावणं किंवा स्वतःच्या मुलाला लावणं हे तर प्रत्येकाचं उद्दिष्ट असतंच. त्याचबरोबर कळत-नकळत लागलेल्या चुकीच्या किंवा वाईट सवयी स्वतःतून घालवायच्या कशा? हाही अनेकांचा प्रश्न असतो. . हे पुस्तक या दोन्ही प्रकारांच्या सवयींवर भाष्य करेल. खरं तर हे पुस्तक फक्त लहान मुलांसाठी नाहीये. हे आपल्या happy आहे. लहान मुलं एक निमित्त बनतील की, त्यांना सवयी लावता लावता आपणही आपल्या स्वतःचं अवलोकन करू, स्वअवलोकन करू ज्यामुळे कुठल्या सवयी जास्त आधोरेखित करायच्या, कुठल्या सवयी पुसट करायच्या हे ठरवणं आपल्याला सोपं जाईल. या पुस्तकात सवयींची चर्चा आहेच, प्रत्येक सवय ही काय देऊन जाते त्याचबरोबर ही सवय कशी लावायची, त्याच्या काय पद्धती असतील हेही या पुस्तकात पायरी-पायरीने समजून सांगितले आहे. पुस्तकातील महत्त्वाचे मुद्दे…. प्रत्येक मुलामध्ये असायलाच हव्यात अशा सवयी, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, बौद्धिक, सामाजिक आणि भावनिक बळ देणार्‍या सवयी या सवयी मुलांना काय देऊन जातील? या सवयी मुलांना कशा लावाल? चांगल्या सवयी कशा निर्माण कराल?

४) आबा’ज् मेथड(संस्कारित आणि सुसंस्कृत मुले घडवण्यासाठी संस्कार कथा)लेखक: मनोज अंबिके: पाने: ९६ किंमत: १२४ /-आवृत्ती:- २: सुप्रसिद्ध लेखक मनोज अंबिके लिखित आबा’ज मेथड या पुस्तकात मुलांसाठी उपयुक्त अशा अनेक मनोरंजक कथा आहेत. खरंतर या कथा नसून एक एक संस्कार आहेत, सवयी आहेत. अतिशय सोप्या आणि ओघवत्या शैलीतील कथांमधून मुलांवर आवश्यक गोष्टींचे संस्कार त्यांच्याही नकळत बिंबवता येतात. मुले टीव्ही बघतात, ताट स्वच्छ करीत नाहीत, स्वतःची रूमही साफ ठेवत नाहीत, स्वतःहून कोणतंही काम करत नाहीत… अशा अनेक तक्रारी पालक करतात. या पुस्तकामध्ये मात्र आबा आणि त्यांचा नातू चंदू या पात्रांच्या साहाय्याने मुलांसाठी अत्यंत आवश्यक असणार्‍या सवयी, संस्कार आजोबा नातवावर कशा प्रकारे करतात हे अतिशय सोप्या शब्दांत सांगितलं आहे. आपली मुले संस्कारित व्हायला हवीत, त्यांनी साहसी बनावं, विचार कसा करावा हे त्यांना समजायला हवं, नियमांचं महत्त्व त्यांना समजावं, त्यांच्यात इच्छाशक्ती हवी… अशा अनेक अपेक्षा मुलांकडून बाळगल्या जातात. परंतु याबाबतीत केलेलं थेट मार्गदर्शन त्यांना आवडत नाहीत. या पुस्तकात दिलेल्या कथांच्या माध्यमातून या गोष्टी मुलांमध्ये रुजवणं खूप सोपं जातं. मुलांना प्रशिक्षण देता देता लाडके आजी-आजोबा, लाडके आई-बाबा कसे बनावे, यावर भाष्य करणारे अतिशय समर्पक असे पुस्तक प्रत्येकाने वाचायलाच हवे असे आहे.मानसशास्त्र आणि पालकत्व या विषयांवर हातखंडा असणारे लेखक मनोज अंबिके यांनी आपल्या अनेक वर्षांच्या अभ्यासाचे सार यात उतरवले आहे. प्रकाशक:- मायमिरर पब्लिशिंग हाऊस प्रा.लि. www.mymirrorpublishing.com