Home Uncategorized आजचा सुविचार.

आजचा सुविचार.

70

सुविचार :

आपली पहिली शाळा आईच असते.

अर्थ :

मूल जन्माला येते ते आईच्या कुशीतच वाढते. आईच मुलाला बोबडे बोल बोलायला शिकवते .आईचा हात धरून मुले मोठी होतात. मुलांचे भरण पोषण सर्वच करते. थोडे मोठे झाल्यानंतर संस्कारांचे धडे आईच देते. इतरांशी बोलावे कसे वागावे, कसे हे सर्व शिष्टाचार आई आपल्याला शिकवत असते, आपली चूक झाली तर योग्य मार्गदर्शनही करत असते आणि त्या चुका पुन्हा होऊ नये, यासाठी विविध उपायही सांगत असते यामुळे आपले व्यक्तीमत्व सतत खुलत राहते. भविष्यात जीवन जगत असताना आपल्याला अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी योग्य ती प्रेरणा मिळत राहते, त्यामुळेच म्हणतात आईच मुलाची पहिली शाळा असते.